Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update : वरूणराजाचा लपाछपीचा खेळ; अल निनो, वादळ कारणीभूत

तीन दिवस बरसल्यानंतर सोमवार ठरला कोरडा

दैनिक गोमन्तक

केरळमध्ये तब्बल 8 दिवस उशिरा दाखल होऊनसुद्धा केवळ 18 दिवसांच्या विक्रमी वेळेत मॉन्सूनने देश व्यापला आहे. मात्र, राज्यात पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. हवामान खाते तांत्रिकदृष्ट्या पाऊस पडत असल्याचे सांगत असले, तरी ‘ऑरेंज अलर्ट’ दिवशी ‘ऑरेंज ऊन’ अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

काही दिवसांत मॉन्सून पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हवामान क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. एम. रमेशकुमार म्हणाले, प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय आहे. त्याचा विपरीत परिणाम यंदाच्या मॉन्सूनवर होणार हे अपेक्षित होते. त्यामुळे यंदाचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी बरसेल असे अंदाज खासगी क्षेत्रातील हवामान प्रयोगशाळांनी व्यक्त केले होते.

सध्या मॉन्सूनपुढे ५३.८ टक्के तूट भरून काढणे मोठे आव्हान आहे. असे असले तरी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत चांगला पाऊस पडण्याचे अनुमान आहे. अरबी समुद्रात गोवा किनारपट्ट्यांलगत ताशी ५५ ते ६५ किलोमीटर प्रतितास वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

मागील २४ तासांत सर्वाधिक पाऊस फोंडा येथे ९०.४ मि.मी., तर दाबोळी, केपे, डिचोली, मुरगाव, पणजी, साखळी व राज्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

५३.८ टक्के तुटीचे आव्हान

यंदा राज्यात मॉन्सून उशिरा ११ जून रोजी सक्रिय झाला, त्यानंतरही अपवादात्मक स्थिती वगळता पावसाचा जोर कमीच होता. सर्वसाधारणपणे ७७२.६ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना केवळ ३५७ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे निर्माण झालेली ५३.८ टक्के तूट भरून काढणे सध्या तरी पावसाच्या समोरचे मोठे आव्हान आहे. अशातच पावसाच्या विश्रांतीमुळे ही तूट कमी जास्त होत आहे

बंगालच्या उपसागरात पूरक स्थितीचा अभाव

मध्य भारतीय उपखंड आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे आणि स्थित्यंतरे भारतीय उपखंडात मॉन्सून सक्रिय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. यंदा अरबी समुद्रात मॉन्सून सक्रिय होत असतानाच बिफरजॉय चक्रीवादळ झाले. त्यामुळे संपूर्ण पाऊस विस्कळीत झाला.

त्यानंतर २२ आणि २३ जूनला पुन्हा पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होतील अशी स्थिती होती आणि ते झाले. मात्र, त्यांची क्षमता तितकी तीव्र नव्हती. त्यामुळे सध्या राज्यात ॲक्टिव्ह ब्रेक अनुभवायला मिळत आहे, असे हवामान क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. एम. डॉ. रमेशकुमार म्हणाले.

...म्हणून ‘ऑरेंज अलर्ट’ असताना ऊन

  1. मॉन्सूनने आज बहुतांश भारतीय उपखंड व्यापला असला, तरी तो स्थिरावलेला नाही. भूखंडांवर निर्माण होणारे ‘ऑफशोर टर्फ’ आणि उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे यामुळे किनारपट्टीलगत छोटे छोटे कमी दाबाचे पट्टे तयार होतात आणि त्याचा परिणाम ढग निर्मितीमध्ये होतो. ते निर्माण झाले तर पाऊस पडतो अन्यथा हवामान कोरडे राहते.

  2. देशभरातील हवामान खात्याच्या वेधशाळांकडून व्यक्त केले जाणारे अंदाज हे वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक मॉडेलनुसार व्यक्त होतात. त्यानुसार त्या भागात पाऊस पडेलच असे नाही. ते केवळ अंदाज असतात. त्यामुळे आज आपण गोव्यात ‘ऑरेंज अलर्ट’ असताना ऊन अनुभवले, असा दावा विविध ठिकाणच्या तज्ज्ञांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT