Goa Politics: ..अखेर ‘आरजीपी’ची वेगळी चूल! काँग्रेससोबत न जाण्‍याचा निर्णय; 28 उमेदवारांचा प्रचार सुरू

RGP Goa: गत झेडपी व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जे मतदारसंघ जिंकले होते, ते युतीतील घटक पक्षांना न देण्‍याचा निर्णय पक्षाने आधीच घेतला होता.
Manoj Parab
Manoj ParabX
Published on
Updated on

पणजी: गेल्‍या काही दिवसांत युतीसंदर्भात घडलेल्‍या घडामोडींनंतर रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षाने (आरजीपी) काँग्रेससोबत न जाण्‍याचा ठाम निर्णय घेत, घोषित केलेल्‍या २८ ही उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे. त्‍यामुळे जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड हे दोनच पक्ष युतीने मैदानात उतरणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

२०२७ मधील विधानसभेची रंगीत तालीम मानल्‍या जाणाऱ्या झेडपी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्‍यासाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या तीन पक्षांची युती करण्‍याचा निर्णय तिन्‍ही पक्षांच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी काही महिन्‍यांपूर्वी घेतला होता. त्‍यासंदर्भात त्‍यांच्‍यात चर्चा होऊन युती निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले होते. परंतु, सांताक्रूज, शिरोडा आणि हणजुणे या तीन मतदारसंघांवरून जागा वाटप चर्चेत अडथळे येत होते.

गत झेडपी व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जे मतदारसंघ जिंकले होते, ते युतीतील घटक पक्षांना न देण्‍याचा निर्णय पक्षाने आधीच घेतला होता. तरीही विधानसभेत जिंकलेल्‍या काही मतदारसंघांत तडजोडीचीही तयारी दर्शवली होती. अशा स्‍थितीतही तिन्‍ही पक्षांत चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने अकरा मतदारसंघांतील उमेदवारांची यादी जाहीर केल्‍याने आरजीपीचे अध्‍यक्ष मनोज परब यांनी संताप व्‍यक्त केला होता.

युती आणि जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्‍याने त्‍यांनी आश्‍‍चर्यही व्‍यक्त केले होते. त्‍यानंतर लगेचच आरजीपीनेही बारा उमेदवारांची यादी जाहीर केल्‍याने आरजीपी युतीत सहभागी होणार नाही, हे स्‍पष्‍ट झाले होते. तरीही काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी बोलावलेल्‍या बैठकीला मनोज परब आणि वीरेश बोरकर यांनी उपस्‍थिती लावल्‍याने काँग्रेस–आरजीपी युतीबाबतच्‍या आशा पुन्‍हा पल्लवित झाल्‍या होत्‍या.

Manoj Parab
Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

दरम्‍यान, शनिवारच्‍या बैठकीत काँग्रेसने आम्‍हाला नवा प्रस्‍ताव दिला असून, त्‍याबाबत पक्षाच्‍या नेत्‍यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्‍यात येणार असल्‍याचे मनोज परब यांनी सांगितले होते. शिवाय काँग्रेसने दिलेल्‍या नव्‍या प्रस्‍तावाला पक्षाच्‍या नेत्‍यांनी मान्‍यता दिल्‍यानंतरच काँग्रेस नेत्‍यांची भेट घेणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. परंतु, रविवारी त्‍यांनी याबाबत काँग्रेस नेत्‍यांनी कोणताही संपर्क साधला नाही. उलट आतापर्यंत जाहीर केलेल्‍या उमेदवारांचा दारोदारी प्रचारही सुरू केला. त्‍यामुळे काँग्रेस–आरजीपी युती फिस्‍कटल्‍यात जमा झाली आहे.

Manoj Parab
Goa Politics: सांताक्रुझ, शिरोडा, हणजूणवरून अडले युतीचे घोडे! ठाकरेंची सरदेसाई, परब यांसोबत बैठक; काय होणार घोषणा? राज्याचे लक्ष

काँग्रेस, फॉरवर्डकडून उमेदवारांची घोषणा

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत युतीत असलेल्‍या गोवा फॉरवर्डला आठ ते नऊ जागा देण्‍याचा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे. काँग्रेसने काही मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली असली, तरी गोवा फॉरवर्डने आतापर्यंत उमेदवार घोषित केलेले नाहीत. अर्ज भरण्‍यासाठी मंगळवारचा अखेरचा दिवस असल्‍याने काँग्रेस उर्वरित आणि गोवा फॉरवर्ड आपल्‍या उमेदवारांची घोषणा सोमवारी करणार असल्‍याचे दोन्‍ही पक्षांच्‍या सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com