CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : पावसाळ्यातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज : मुख्यमंत्री डॉ. सावंत

बैठकीत आपत्कालिन व्यवस्थापनातील विविध विषयांवर चर्चा

Rajat Sawant

पावसाळ्यातील कोणत्याही परिस्थितीसाठी सरकार सज्ज आहे. सरकारने आपदा मित्र व सखीला आपत्कालिन परिस्थितीत कार्य करण्यासाठी प्रशिक्षित केले आहे. सरकारी यंत्रणा 24 तास अलर्टवर आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

आपत्कालिन व्यवस्थापनाची तयारीसंदर्भातची बैठक आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

या चर्चेवेळी आयआरएस अधिसूचना काढण्यात आली. केंद्र सरकारने जारी केलेला सचित मोबाईल ॲप सर्व लोकांनी डाऊनलोड करावा. या ॲपद्वारे राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही घटनेची माहिती देता येते. या चर्चेमध्ये आपत्कालिन व्यवस्थापनातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

नैसर्गिक आपत्ती कोणी रोखू शकत नाही. आपत्ती उद्भवल्यास ती पूर्वस्थितीत आणण्यासाठी संबंधित खात्याच्या पथकांना तयार ठेवण्यात आले आहे. प्रत्येक खात्याला मोठ्या घटनेच्या बचावसाठी स्थानिक बचावकार्य आराखडा तयार ठेवण्यास सांगितले आहे. दोन्ही जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी जबाबदारीनुसार काम करण्यास सुरुवात केली आहे.

पणजीतील स्मार्ट सिटीची कामे या महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करून येथील रस्त्यांची डागडुजी करण्यास सांगितले आहे. मळा येथील पूर स्थिती टाळण्यासाठी रुअ दे ओरेम येथील पाण्याचा पंप बदण्यात येणार आहे अशी माहिती जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वन क्षेत्रात लागलेल्या आगीच्या घटना या नैसर्गिक आहेत की मानवनिर्मीत याचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. येत्या 15 दिवसांत शापोरा व साळ या नद्यांतील गाळ उपसा करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT