Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

South Goa News : शासकीय इमारतीत वैद्यकीय महाविद्यालय नको : सरदेसाई

राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिले पत्र

दैनिक गोमन्तक डिजिटल

येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ इमारतीत खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास गोवा फॉरवर्ड पक्षाने विरोध केला आहे. येथे खासगी महाविद्यालय सुरू केल्यास किंवा या इस्पितळाचे खासगीकरण केल्यास गोवा फॉरवर्ड त्याला कडाडून विरोध करेल, असा इशारा या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

मडगाव आणि फोंडा येथील इस्पितळात असलेल्या त्रुटीबद्दल सरदेसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना एक सविस्तर पत्र लिहिले असून ही दोन्ही इस्पितळे खासगी संस्थेच्या हातात देण्याऐवजी या दोन्ही इस्पितळाचा कारभार सुधारण्यासाठी एक कृती दल स्थापन करून लोकांना येथे कशा चांगल्या सुविधा आणि उपचार देता येतील, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरदेसाई यांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात या दोन्ही इस्पितळातील सुविधांवर चर्चा केली होती.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वरचे दोन मजले विनावापर पडून आहेत. या दोन्ही मजल्यांचा इस्पितळासाठीच वापर करून हे 500 खाटांचे परिपूर्ण इस्पितळ करावे. इस्पितळात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्या, असेही ते म्हणाले.

फोंड्यात सुविधा वाढवा

फोंडा येथील इस्पितळात आणखी एक रेडिओलॉजिस्ट, नेत्र तपासणी ओपीडी, परिपूर्ण अशी रक्तपेढी, सिटी स्कॅन सुविधा, न्यूरोलॉजिस्ट आणि तातडीने एक्स रे ऑपरेटर नेमण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मधुमेह रुग्ण आणि ह्रदय शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करण्याची गरज या पत्रात व्यक्त केली आहे. मुख्य सचिव या मागण्यांवर गंभीरतेने विचार करून योग्य ते निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT