Mapusa Municipality : प्रकल्प ‘आऊटसोर्स’ तरी म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची नेमणूक

म्हापसा पालिकेने कुचेली व आसगाव पठार हे दोन्ही प्रकल्प चालवण्यासाठी कंत्राटदारांकडे दिले
MAPUSA MUNICIPAL COUNCIL
MAPUSA MUNICIPAL COUNCILGomantak Digital Team
Published on
Updated on

Mapusa Municipality : येथील नगरपालिकेने आसगाव तसेच कुचेली पठारावरील कचरा प्रकल्प हे आऊटसोर्स केले आहेत. तरीही या दोन्ही प्रकल्पांवर पालिका कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत कचरावाहू वाहनांचे वजन तपासणीचे काम त्यांच्यावर सोपविले आहे.

पालिकेच्या या कारभाराविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू असून या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भुर्दंड पालिकेला बसत आहे. म्हापसा पालिकेने कुचेली व आसगाव पठार हे दोन्ही प्रकल्प चालवण्यासाठी कंत्राटदारांकडे दिले आहेत.

MAPUSA MUNICIPAL COUNCIL
Anjunem Dam Water Level Falling: चिंता वाढली, 55 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक; पाऊस न पडल्यास कपातीचं संकट

कुचेली प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर तर आसगाव पठारावरील प्रकल्पात मिश्रित तसेच जुन्या ढिगारे पडलेल्या कचऱ्यावर प्रक्रियेची जबाबदारी कंत्राटदारांकडे दिली आहे. यामुळे या दोन्ही प्रकल्पांवरील पालिका कर्मचाऱ्यांना हटवून त्यांच्यावर इतर कामे दिली आहेत.

पण पालिकेने कुचेली प्रकल्पावर एका पालिका पर्यवेक्षकाला व आसगाव पठारावर एका रोजंदारी कामगाराची नियुक्ती केली आहे. या रोजंदारी कामगारावर पूर्वी पालिकेने पर्यवेक्षकाची जबाबदारी दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com