Sada International Swimming pool  Dainik Gomantak
गोवा

Goa Child Rights Commission : जलतरण तलावांमध्ये त्वरित प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमा

हयगय केल्‍यास हॉटेलचालकांवर कारवाई

दैनिक गोमन्तक डिजिटल

मागच्‍या काही वर्षांत हॉटेल्‍सच्‍या जलतरण तलावात अनेक बालकांना बुडून मृत्‍यू येण्‍याच्‍या घटना घडल्‍या असून या घटनांची दखल गोवा राज्य बाल अधिकार रक्षण आयोगाने घेतली आहे. ज्‍या ठिकाणी असे जलतरण तलाव आहेत, त्‍या सर्व हॉटेलचालकांना आणि अन्‍य आयोजकांना तिथे प्रशिक्षित जीवरक्षक नेमण्‍याची सक्‍ती करावी, अशी शिफारस पर्यटन खात्‍याला केली आहे.

काही दिवसांपूर्वी वार्का येथील क्‍लब महिंद्रा या हाॅटेलच्‍या जलतरण तलावात बुडाल्‍याने बंगळूर येथील एका पाच वर्षीय मुलाचा अपघात झाला होता. आईवडील जवळ नसताना हा मुलगा एकटाच तलावात उतरला होता. त्‍यावेळी तो बुडाल्‍याने त्‍याला त्‍वरित इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले होते.

मात्र, उपचारादरम्‍यान त्‍याचे निधन झाले होते. या घटनेची दखल गोवा बाल अधिकार रक्षण आयोगाने घेतली असून गुरुवारी या आयोगाने पर्यटन खात्‍याला लिहिलेल्‍या पत्रात अशा ठिकाणी आवश्‍‍यक ते सुरक्षेचे उपाय घेण्‍यात यावेत अशी तजवीज करण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

बाल अधिकार आयाेगाचे अध्‍यक्ष पीटर बोर्जीस यांनी कित्‍येक हॉटेल्‍समधील स्‍वीमिंगपूल वरती लहान मुलांना पोहायला सोडताना आवश्‍‍यक ते सुरक्षेचे उपाय घेतले जात नाहीत याकडे लक्ष वेधले आहे. हॉटेल्‍स व इतर आस्‍थापनांना स्‍वीमिंगपूलवरती सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक करण्‍याची गरज असून जर त्‍यात हयगय झाल्‍यास त्‍या मृत्‍यूस त्‍या आस्‍थापनाच्‍या व्‍यवस्‍थापनाला जबाबदार धरून कारवाई करण्‍याची सूचना केली आहे.

सहा वर्षांत सहा बालकांचा मृत्यू

मागच्‍या सहा वर्षांत जलतरण तलावात बालके बुडून मरण्‍याच्‍या सहा घटना घडल्‍या असून त्‍यातील तीन घटना २०१७ मध्‍ये घडल्‍या होत्‍या. एप्रिल २०१७ मध्‍ये कोलवा येथे एका हॉटेलमधील तलावात बुडून कर्नाटकमधील १७ वर्षाच्‍या मुलीचा मृत्‍यू झाला होता. मे २०१७ मध्‍ये कळंगुटमध्ये चार वर्षाच्‍या उत्तर प्रदेशमधील मुलाचा मृत्‍यू झाला होता.

डिसेंबर २०१७ मध्‍ये कांदोळी येथे चार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. २०१८ मध्‍ये कळंगुट येथील एका हॉटेलच्‍या स्‍वीमिंगपूलमध्‍ये ९ वर्षाच्‍या दिल्‍लीच्‍या मुलाचा, नाेव्‍हेंबर २०२२ मध्‍ये कांदोळी येथील एका हॉटेलच्‍या स्‍वीमिंगपूलमध्‍ये मुंबईतील सहा वर्षाच्‍या मुलाचा अंत झाला होता, तर आता वार्का येथे झालेली ही मृत्‍यूची घटना या मालिकेतील सहावी घटना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT