The girls ran away due to the fear of their parents Dainik Gomantak
गोवा

आई-बाबा ओरडतील म्हणून मुली गेल्या पळून! गोव्याकडे येत असताना... पुढे काय झालं एकदा वाचाच

काशिमिरा येथील नगरपालिकेच्या बागेत खेळत असलेल्या 3 मुली रहस्यमयरीत्या गायब झाल्या. मात्र पोलिसांच्या सहा तासांनंतर शर्तीच्या प्रयत्नांनंतर त्यांना शोधण्यात यश आले.

दैनिक गोमन्तक

अनेकदा अशा काही घटना असतात ज्यामुळे हृदयाचा थरकाप तर उडतोच, पण या घटना नक्कीच आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काशिमिरा येथील नगरपालिकेच्या बागेत खेळत असलेल्या 3 मुली रहस्यमयरीत्या गायब झाल्या. मात्र पोलिसांच्या सहा तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर त्यांना शोधण्यात यश आले. पण या मुली अशा अचानक गायब का झाल्या? वाचा हे सविस्तर प्रकरण.

मुली बागेत खेळायला गेल्या होत्या आणि संध्याकाळी 7 वाजता घरी परतणार होत्या. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत त्या परत न आल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला, त्यानंतर काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

हे होते गायब होण्यामागील कारण

उशिरा बाहेर राहिल्याबद्दल आई-बाबा फटकारतील, आपल्याला ओरडतील या भीतीने मुली घरी जायच्या ऐवजी पळून गेल्या असल्याचे पोलिसांना नंतर कळले. पालकांच्या तक्रारीनंतर अपहरण (मुली 11, 13 आणि 14 वर्षे वयोगटातील अल्पवयीन असल्याने) कलम 363 अन्वये अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहरण किंवा मानवी तस्करी या भीतीपोटी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुलींचा माग काढायला सुरुवात केली.

मुंबई पोलिसांनी मुलींची अशी सुटका केली

पोलिसांनी तिन्हीही मुलींची छायाचित्रे सर्व पोलिस ठाण्यात प्रसारित केली आणि व्हॉट्सअॅपसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील पोस्ट केली. मात्र पोलिसांकडे फक्त एकच सुगावा होता तो म्हणजे एका मुलीकडे असलेला मोबाईल, जो तिने सोबत नेला होता.

या मुली दादर, कल्याणमार्गे ठाणे रेल्वे स्थानकावर आल्याचे तपासात समोर आले असून त्या गोव्याकडे जात असल्याचे सांगण्यात आले. बंद असलेल्या मोबाईल क्रमांकाबाबत पोलिसांना खात्री नसल्याने त्यांनी पाळत ठेवली.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांनी सांगितले की, "आम्ही तो मोबाईल फोन कधी सुरु होतोय याची वाट बघत होतो, शेवटी नंबर सक्रिय झाला. आम्ही त्याचा मागोवा घेणे सुरू केले आणि त्या पनवेलहून रत्नागिरीकडे जात असल्याचे आढळले. आम्ही रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकांशी जुळवून घेणे सुरू केले आणि त्या मांडवी एक्स्प्रेसमध्ये असल्याचे आम्हाला समजले."

पालकांच्या रोषाला घाबरून मुली पळून गेल्या

पोलीस पथकाने त्यांच्या खेड सहकाऱ्यांशी संपर्क साधून मुलींचे फोटो दिले. खेड पोलिसांनी मुलींना शोधून सुरक्षितपणे काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात दिले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही बालकल्याण समितीशी संपर्क साधला आहे आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मुलींचा ताबा त्यांच्या पालकांना दिला जाईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT