Pissurlem Industrial Estate: पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत कंपनीला आग

शॉर्टसर्किटचा अंदाज : 20 लाखांहून अधिक नुकसान; बरीच मालमत्ता वाचविली
Pissurlem Industrial Estate
Pissurlem Industrial EstateDainik Gomantak

पर्ये मतदारसंघात येणाऱ्या पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या गरीब नवाज कारखाना या स्क्रॅप प्लास्टिकवर प्रक्रिया करून उत्पादन तयार करण्यात येणाऱ्या कंपनीला आज बुधवारी सकाळी 10 वा.च्या दरम्यान आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे मालक महम्मद मुस्तकी शाह यांनी व्यक्त केला. यात कंपनीला २० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे ते म्हणाले.

गत एक वर्षाच्या काळापासून स्क्रॅप प्लास्टिकवर रिसायकल करून उत्पादन करण्याचे काम सुरू होते. मात्र, सकाळी 10 वा.च्या दरम्यान या कंपनीच्या उत्पादन प्रक्रिया सुरू असलेल्या भागात अचानक आग लागून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने कंपनीच्या कामगारांची धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचून आग आटोक्यात आणली. वाळपईचे दोन, डिचोलीहून एक अशा तीन पाण्याच्या बंबांचा वापर झाला.

येथील कंपन्यांत नियमानुसार सर्व उपाययोजना आहेत की नाहीत, हे बघण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. परिसरात दोन मोठ्या औद्योगिक वसाहती असूनही सरकारने येथे अग्निशमन दलाचे केंद्र सुरू केले नाही. त्यासाठी पिसुर्ले येथे जागेचे नियोजन करून ठेवले आहे. याप्रकरणी सरकारने तातडीने लक्ष देऊन येथे अग्निशमन दलाचे केंद्र उभारावे. - देवानंद परब, सरपंच, पिसुर्ले

Pissurlem Industrial Estate
Fire In Goa: सत्तरीचा पश्‍चिम घाट आगीच्या भक्ष्यस्थानी

मशिनरीचे नुकसान

या कंपनीत उत्पादन प्रक्रिया सुरू असलेल्या भागात प्रथम आग लागून यामध्ये मशिनरी, काही तयार करून ठेवलेला माल, तसेच कच्चा माल, कंपनीचे छप्पर हे पूर्णपणे जळून खाक झाले, तर वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच खासगी जवानांनी मोठ्या शिताफीने आग विझविण्यात यश मिळविल्याने, कंपनीच्या एका भागात साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कच्चा माल वाचला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com