Goa Cricket Association Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket Association: जीसीए प्रीमियर लीगला एक मार्चपासून होणार सुरवात, गतविजेत्या जीनो क्लबची ईशानवर मदार

गतउपविजेत्या धेंपो क्रिकेट क्लबने अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

Goa Cricket Association गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला येत्या एक मार्चपासून सुरवात होईल. यंदा स्पर्धेत सहा संघांत चुरस असून करिमाबाद क्रिकेट क्लबच्या अनुपस्थितीत पणजी जिमखान्याने स्पर्धेत पुनरागमन केले.

गतविजेत्या जीनो स्पोर्टस क्लबने शुक्रवारी झालेल्या खेळाडू लिलावात रणजी पदार्पण आश्वासक ठरलेल्या ईशान गडेकर या डावखुऱ्या सलामीवीरावर विश्वास दाखविला. तो संघातील प्रमुख खेळाडू आहे.

स्पर्धेतील गतउपविजेत्या धेंपो क्रिकेट क्लबने अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य दिले. युवा दीप कसवणकर, सलामीचा मंथन खुटकर, अनुभवी लक्षय गर्ग, यष्टिरक्षक करण वसुदिया यांच्यामुळे या संघाची ताकद वाढली आहे.

साळगावकर क्रिकेट क्लबनेही संघात दर्जेदार खेळाडू घेतले असून दीपराज गावकर, विजेश प्रभुदेसाई, अमोघ देसाई, अमूल्य पांड्रेकर यांच्यासह यश कसवणकर व दिशांक मिस्कीन असा अनुभवी व युवा यांचा संगम साधला गेला. पणजी जिमखान्याची फलंदाजी स्नेहल कवठणकरमुळे बलवान झाली आहे.

दर्शन मिसाळला सर्वाधिक मागणी

यंदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरी केलेल्या डावखुऱ्या दर्शन मिसाळ याला मडगाव क्रिकेट क्लबने संघात घेतले. रणजी संघ कर्णधारास लिलावात सर्वाधिक 22600 गुण मिळाले. मडगावच्या संघात कीथ पिंटो हा आश्वासक डावखुरा फिरकी गोलंदाजही आहे. चौगुले क्लबने अष्टपैलू मोहित रेडकरला आपल्या संघात घेताना २१०० गुण दिले.

संघांची दोन गटात विभागणी

अ गट ः धेंपो क्रिकेट क्लब, चौगुले स्पोर्टस क्लब, साळगावकर क्रिकेट क्लब

ब गट ः जीनो स्पोर्टस क्लब, पणजी जिमखाना, मडगाव क्रिकेट क्लब (एमसीसी)

स्पर्धेचे वेळापत्रक

- तारीख १ ते ३ मार्च - धेंपो विरुद्ध चौगुले (पर्वरी), जीनो विरुद्ध पणजी जिमखाना (सांगे)

- तारीख ८ ते १० मार्च - जीनो विरुद्ध एमसीसी (पर्वरी), धेंपो विरुद्ध साळगावकर (सांगे)

- तारीख १५ ते १७ मार्च - पणजी जिमखाना विरुद्ध एमसीसी (पर्वरी), चौगुले विरुद्ध साळगावकर (सांगे)

- उपांत्य फेरी - तारीख २० ते २२ मार्च - पर्वरी व कांपाल-पणजी

- अंतिम सामना - तारीख २५ ते २७ मार्च - पर्वरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT