Calangute News: कळंगुटमधील क्लबच्या आगीचे कारण गुलदस्त्यात, अग्निशमन दलाने दिली 'ही' माहिती

कळंगुट येथील हॉटेल लिंडानजीक असलेल्या पॉश- नॉश या नाईट क्लबला गुरुवारी रात्री आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते.
Calangute Restaurant Fire
Calangute Restaurant FireDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Restaurant Fire: खोब्रावाडा- कळंगुट येथील हॉटेल लिंडानजीक असलेल्या पॉश- नॉश या नाईट क्लबला गुरुवारी रात्री आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. बार्देशातील म्हापसा, पिळर्ण तसेच पर्वरी येथील अग्निशमन दलाच्या एकूण सहा बंबांचा वापर करीत रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणली. मात्र, ही आग नेमकी कशाने लागली याबाबत मतभिन्नता आढळून आली.

दरम्यान, कळंगुट-बागा येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या येथील तीन मजली इमारतीत असलेल्या पॉश-नॉश क्लबच्या दुसऱ्या मजल्यावर संध्याकाळी 7 च्या सुमारास ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबतीत म्हापसा अग्निशमन दलाला माहिती देताच तात्काळ दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.

ही आग कशी लागली याबाबत मतभिन्नता असल्याचे निदर्शनास आले. क्लबच्या कामगाराने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या मजल्यावरील देव्हाऱ्यातील दिव्यांची वात जवळच्या पडद्याच्या संपर्कात आल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले तर क्लब मालकांकडून याबाबतीत वेगळीच माहिती देण्यात आल्याचे अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Calangute Restaurant Fire
Goa Police: गोव्यातील वाढत्या अपघातांची 'डीजीपी'कडून दखल, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

मात्र क्लबच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात मद्यांच्या बाटल्यांचा साठा असल्याने आगीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत होते, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दुसऱ्या मजल्यावरील आगीचा भडका तिसऱ्या मजल्यापर्यंत गेल्याने शेवटी पिळर्ण तसेच पर्वरी येथून अधिक पाण्याचे बंब बोलावून घेण्यात आले. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवता आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com