Bicholim Fire News Dainik Gomantak
गोवा

Borim Fire Case: बोरीत कचऱ्याला लावली आग; शेड जळून खाक

Borim Fire Case: बोरी ग्रामपंचायतीने साठवून ठेवलेल्या कचऱ्याला आज रविवार 11 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने आग लावल्याने कचरा साठवून ठेवलेली शेड व कचरा जळून खाक झाला.

दैनिक गोमन्तक

Borim Fire Case: बोरी ग्रामपंचायतीने साठवून ठेवलेल्या कचऱ्याला आज रविवार 11 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने आग लावल्याने कचरा साठवून ठेवलेली शेड व कचरा जळून खाक झाला.

खाजोर्डा बोरीच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या क्रीडा मैदान शेजारी जी शेड आहे या शेडमध्ये ग्रामपंचायतीतर्फे गावातील एकत्रित केलेला कचरा साठवून ठेवला जातो. तसेच वाहनातून आणलेला कचरा शेडच्या बाहेरही ठेवला जातो.

आज संध्याकाळी या शेडमधील कचऱ्याला अज्ञात इसमाने आग लावल्यावर कचऱ्याने पेट घेतला. शेडवरील पत्रे या आगीच्या ज्वालानी तापून वाकडे झाले.

या कचरा यार्डला आग आगल्याची तक्रार फोंडा अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटना स्थळी आली व आग विझविण्याचा प्रयत्न

केला. तोपर्यंत पूर्ण कचरा जळून गेला होता. दोन महिन्यापूर्वीच येथील कचऱ्याला कोणी तरी आग लावली होती. दर दोन तीन महिन्याने दुर्गम भागातील या कचरा यार्डला अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्याचे प्रकार सतत घडू लागले आहेत. या आगीमुळे भिंतीचे आणि छपराचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT