देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या राज्यांमध्ये गोव्याचाही समावेश आहे. गोव्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करत आहे. तर दुसरीकडे विरोधक भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोव्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाल्याने (Goa) राजकीय गणितं वेगाने बदलू लागली आहेत.
गोव्यात नव्याने दाखल झालेला ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमुल पक्षाने महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाबरोबर युती करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. तर कॉंग्रेसने गोवा फॉरवर्डबरोबर युती केली आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उत्सुक आहेत. मात्र कॉंग्रेसकडून (Congress) अद्याप युतीसंबंधी कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
दरम्यान, राऊत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, ''महाराष्ट्रात आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सत्तेमध्ये आहोत. मात्र गोव्याबद्दल विचार करायचा झाल्यास अद्याप कॉंग्रेससोबत कोणत्याही स्वरुपात जागा वाटपाचा फॉर्म्युला झालेला नाही. यामध्ये पक्ष म्हणून त्यांच्या काही मर्यादा असतील तशाच आमच्याही काही मर्यादा आहेत. आम्ही गोव्यातील चाळीस जागांसाठी उमेदवारांची यादी तयार करत आहोत, त्यानुसार आम्ही निवडणुका लढवू. त्यासाठी 18 आणि 19 तारखेला अम्ही पुन्हा एकदा गोव्याला चाललो आहे. तेव्हा आम्ही उमेदवारांची यादीही जाहीर करु.''
राऊत पुढे म्हणाले, ''गोव्यातील सामान्य जनतेसाठी आम्ही भाजपच्या विरोधात निकराने लढू. सध्या गोव्याचं राजकारण प्रस्थापितांच्या हातामध्ये गेले आहे. जमीन माफिया, भ्रष्टाचारी राजकारणी आणि ड्रग्ज माफियांच्या हातामध्ये गोव्याची पूर्ण सूत्रे गेली आहेत. त्यामुळे हे जर बदलायचे असेल तर आपल्यातीलच एक असलेल्या सर्वसामान्य उमेदवाराला जनतेने निवडून आणायला हवं. एककीकडे गोव्यात प्रथमच ममता बॅनर्जी यांचा तृणमुल पक्ष गोव्यात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री गोव्यात येऊन डोअर टू डोअर प्रचार करत होते, आणि तिकडे मात्र दिल्लीत कोरोनाचा प्रसार वाढण्यास सुरुवात झाली.''
शिवाय, गोव्यासह उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि उत्तरप्रदेश राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. देशात लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य असणारे उत्तरप्रदेश देशाच्या राजकारणाचा केंद्रबिदू बनले आहे. योगी सरकारला सोडून मंत्र्यासंह आमदार सोडून चालले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) गोरखपूरमधून यावेळी विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्यामध्ये भाजप यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.