Fire in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Fire: खाण डंपवरील जंगल भडकले

सोनशीत आगीचा रुद्रावतार : अग्निशामक दलाचे जवान हतबल

गोमन्तक डिजिटल टीम

साखळीतील शिगमोत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जंगलांना आग लावण्याचे प्रकार थांबविण्याचे आवाहन केल्यानंतर काही क्षणातच कुडणे-सोनशी येथील खाण डंपवरील जंगलात आग भडकल्याची माहिती समोर आली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती आटोक्यात आणण्याचे सर्व प्रयत्न विफल ठरले. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना मागे फिरावे लागले.

दरम्यान, आगीचे स्वरूप पाहता ही आग रात्रीत आटोक्यात येणे कठीणच असल्याची चिन्हे दिसत आहेत. शनिवारी (ता.11) सकाळी अग्निशामक दलाचे जवान पुन्हा या भागात आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू करणार आहेत.

होडा-सत्तरी येथील श्री देव आजोबा मंदिराच्या पुढे दिसणाऱ्या डोगरावर ही आग लागली आहे. एका खाण कंपनीच्या मालाच्या डंपवर निर्माण झालेल्या जंगलास रात्री आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. डिचोली येथील दोन्हीही बंब बचावकार्यात इतरत्र गेल्याने वाळपई येथील अग्निशामक दलाला ही माहिती देण्यात आली.

बचावकार्य करण्यात आल्या अडचणी

वाळपई अग्निशामक दलाचा बंब जवानांसह घटनास्थळी दाखल झाला खरा; परंतु त्या डोंगरावर जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने तसेच रात्री सर्वत्र अंधार असल्याने बचावकार्य करणे कठीण बनले. तरीही दलाच्या जवानांनी प्रयत्न केले.

पण ते निष्फळ ठरल्यानंतर अग्निशामक दलाची गाडी माघारी फिरली. ही आग रात्रभर पेटतच राहण्याची भीती आहे. अग्निशामक दलाचा बंब शनिवारी सकाळी जाऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT