Ravindra Kelekar School: एका महिन्यासाठी मोबाईल शाळेतच

परीक्षेनंतर परत : ‘रवीन्द्र केळेकर’मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य निर्णय
Mobile Phone
Mobile PhoneDainik Gomantak

Ravindra Kelekar School आजच्या पिढीतील मुलांना शिक्षक व पालकांनी योग्य मार्गदर्शन केल्यास आणि उत्तेजन दिल्यास ती मोबाईलपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात याचे उदाहरण मडगावच्या कोकणी भाषा मंडळ संचलित रवीन्द्र केळेकर ज्ञानमंदिराच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घालून दिले आहे.

या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल शाळेच्या स्वाधीन केले आहेत. परीक्षा संपल्यावर त्यांना हे मोबाईल परत केले जातील. शेवटचा पेपर झाल्यावर विद्यार्थ्यांना मोबाईल खास बक्षिसासह परत केले जातील, असे दहावीच्या वर्गशिक्षिका दीपश्री देसाई यांनी सांगितले. मुलांच्या या निर्धाराबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत नाईक तसेच व्यवस्थापक अन्वेषा सिंगबाळ यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Mobile Phone
Babush Monserrate: कचरा प्रकल्प नियोजित ठिकाणीच होणार!

15 विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार

शालान्त मंडळाच्या दहावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहेत. त्या पार्श्र्वभूमीवर विद्यालयाने परीक्षेच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पालकांची बैठक बोलावली. या बैठकीत विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत अग्नी यांनी मुलांना आपले मोबाईल एका महिन्यासाठी विद्यालयाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले. त्याला अनुसरून 15 विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल शाळेकडे आणून दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com