FDA Raid At Mapusa Dainik Gomantak
गोवा

FDA Raid At Mapusa: म्हापसामध्ये अन्न आणि औषध प्रशानसनाची मोठी कारवाई; 500 किलो पनीर जप्त

FDA Raid At Mapusa: गोव्यात मागील काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशानसनाकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे.

Manish Jadhav

गोव्यात मागील काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशानसनाकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यातच आता, अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच म्हापसा बसस्थानकावरुन मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

यातच पुन्हा एकदा औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. प्रशासनाने म्हापसा बस स्थानकावरुन तब्बल दिड लाखांचे 500 किलो पनीर जप्त केले. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून येणाऱ्या खाजगी वाहनावर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, म्हापसा (Mapusa) नवीन बसस्थानकावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मोठी छापेमारी केली होती. मुंबईतून गोव्यात येणारे फ्रोजन फूड, मावा, मसाले यासारखे खाद्यपदार्थ या छापेमारीत जप्त केले होते. आता, रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखालील FDA अधिकाऱ्यांनी खाजगी वाहनांची अचानक तपासणी केली, ज्यामध्ये दीड लाखांचे पनीर जप्त करण्यात आले.

तसेच, म्हापसा, हणजुणे, कोलवाळ येथे बेकायदेशीररित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर म्हापसा पोलिसांनी कारवाई केली होती. दुकानमालक आणि विक्रेत्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT