एफडीए(अन्न आणि औषध प्रशासन)ने बुधवारी (ता.१०) पहाटे मडगावच्या कदंब बसस्थानकावर एका आंतरराज्य बसवर छापा टाकत ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या मुद्देमालात २७ हजार रुपयांच्या चपाती व २५ हजार रुपयांचा पनीर होता.
अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या आठवड्यात असेच छापे म्हापशात टाकले गेले. आता आम्ही मडगावात मोहीम उघडली आहे. ज्या पॅकेटमध्ये चपाती व पनीर पॅक करण्यात आले आहे, त्यावर दिलेली माहिती ग्राहकांची दिशाभूल करणारी आहे. कंपनीला दिलेला परवाना कालबाह्य झालेला आहे. शिवाय पॅकेटवर अनेक परवाने नंबर देण्यात आले आहेत.
आम्ही या उत्पादन कंपनीकडे संपर्क साधून सुधारणा करण्यास सांगणार आहोत. तसेच अशाप्रकारचे खाद्यपदार्थ फूटपाथवर फेकले जाऊ नयेत, अशी तंबी त्यांना देण्यात येणार आहे. अशाप्रकारचे खाद्यपदार्थ संरक्षणात्मक कंटेनरमध्ये पॅक करणे आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.