खाण क्षेत्रातील एक प्रमुख ओळख असलेले फोमेंतो मायनींग कंपनी ही, गोव्यातील निवडणूकीसाठी सर्वात जास्त रोखे खरेदी करणारी कंपनी ठरली आहे. फोमेंतोने एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये 13 कोटी रुपये भरले आहेत.
गोव्यातील अनेक व्यापारी कुटुंबांसह टिंबलोस - साळगावकर, ढेंम्पो आणि चौगुले तसेच राज्यातून कार्यरत असलेल्या इतर कंपन्यांनी एकत्रितपणे निवडणूक रोख्यांमध्ये 27 कोटी रुपयांहून अधिक योगदान दिले. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार यापैकी बहुतेक देणग्या विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी म्हाणजेच जानेवारी 2022 मध्ये आल्या होत्या.
फोमेंतो रिसोर्सेसचे अध्यक्ष अंबर टिंबलो आहेत, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड (ILPL) आणि हरदेश ओरेस प्रायव्हेट लिमिटेड सारख्या उपकंपन्यांद्वारे निवडणूक रोखे खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे.
ILPLचे कार्यालय पणजी येथे सांतीनेज येथे आहे, मुख्यत्वे वाहतूक, उत्खनन आणि खनिज उत्खननात गुंतलेला हा व्यवसाय आहे. मांजरेकर हे फोमेंटो ॲग्रो डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गोव्यातून प्रकाशित होणाऱ्या कोकणी दैनिक भांगर भुईनचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. फोमेंतो समूहाचे लोहखनिज प्रक्रिया आणि ट्रक आणि बार्जेसद्वारे वाहतूक करण्यात व्यापक व्यावसायिक हितसंबंध आहेत.
दरम्यान गोव्याशी संबंधित इलेक्टोरल बाँड्सचा मोठा भाग गोवा, कर्नाटक, राजस्थान आणि ओडिशामध्ये लोह खनिज, सोने आणि ॲल्युमिनियमच्या खाणी चालवणाऱ्या वेदांत लिमिटेडसह खाण कंपन्यांनी खरेदी केला होता. ढेंम्पो समूहाने गोवा कार्बन, मोटाऊन ट्रेडिंग, नवहिंद पब्लिकेशन्स आणि देवश्री निर्माण एलएलपी यांसारख्या उपकंपन्यांमार्फत काही निवडणूक रोखे खरेदी केल्याचे समोर येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.