Goa Crime News |  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: ‘हरमल बलात्कार प्रकरणी संशयिताविरुद्ध ‘लुकआऊट’ जारी करणार

Goa Crime News: ‘त्या’ फ्लॅट मालकाची होणार चौकशी

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: ‘हरमल येथे आयोजित करण्यात आलेल्या नाईट कॅम्पवेळी एका ६ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणारा रशियन नागरिक इलिया वासुले याला भाडेपट्टीवर राहण्यास दिले होते त्या घरमालकाची चौकशी करण्यात येणार आहे.

या कॅम्पवेळी उपस्थित असलेल्या मुलांच्या जबान्या नोंदवण्यात येत आहेत. संशयिताविरुद्ध ‘एफआरआरओ’ विभागाकडून लुकआऊट नोटीस जारी केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

भाडेपट्टीवर खोली किंवा फ्लॅट देणाऱ्या मालकाने भाडेधारकाची माहिती सी फॉर्म भरून जवळच्या पोलिस स्थानकात देणे सक्तीचे आहे. याप्रकरणातील संशयिताला भाड्याने फ्लॅट दिलेल्या मालकाने माहिती दिली नसल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल.

हा नाईट कॅम्प मुलांसाठीच होता व तेथे त्यांचे पालक नव्हते. हा कॅम्प 15 दिवसांपूर्वी झाला होता. मुलीच्या आईने या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी मांद्रे पोलिस स्थानक गाठले होते. मात्र, तेथील पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून न घेता त्यांना पणजी महिला पोलिसांत जाण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारीस उशीर झाला.

दरम्यानच्या काळात संशयित रशियात गेल्याची माहिती समोर येत आहे. भारतातून तो गेला असल्यास त्याला चौकशीसाठी गोव्यात आणण्यासाठी देशाच्या गृह मंत्रालयाच्या मदतीने रशियाच्या सरकारशी संपर्क व्यवहार करण्याची गरज भासणार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT