India's First Lighthouse Festival Dainik Gomantak
गोवा

India's First Lighthouse Festival: दीपगृह पर्यटनाला मिळणार चालना

India's First Lighthouse Festival सर्बानंद सोनोवाल : तीन दिवसांच्या देशाच्या पहिल्या दीपगृह महोत्सवाला सुरुवात

दैनिक गोमन्तक

India's First Lighthouse Festival: दीपगृहांद्वारे जहाजांना सुरक्षित प्रवासासाठी मार्गदर्शन केले जात असताना, ते आता लोकांना निसर्गाच्या भव्य सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. यासाठीच या पहिल्या ऐतिहासिक दीपगृह महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवाद्वारे दीपगृह पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, असे मत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले आहे.

दीपगृहांवर केंद्रित पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि भारताच्या सागरी इतिहास, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील दीपगृहांच्या अमूल्य भूमिकेचा प्रचार प्रसार करण्यासाठी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि केंद्रीय दीपगृह संचालनालयाच्या वतीने गोव्यात देशाच्या पहिल्या दीपगृह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सोनोवाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार मायकल लोबो, केंद्रीय दीपगृह संचालनालयाचे महानिर्देशक मुरुगानंद उपस्थित होते.

सिक्केरी येथील फोर्ट अग्वाद येथे आजपासून ३ दिवस हा महोत्सव चालेल. देशाच्या किनाऱ्याचे लँडस्केप आणि देशाच्या विकासातील नद्या-बंदरे- जल वाहतूक यांचे महत्त्व ठळकपणे मांडणे, हे भारत प्रवाह आयोजित महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

मंत्री सोनोवाल म्हणाले, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या देशभरात हा ऐतिहासिक दीपगृह महोत्सव सुरू करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्र उभारणीसाठी कटिबद्ध आहोत. दीपगृहे, ज्यांना नेव्हिगेशनल साधन म्हणून पाहिले जाते पण या पलीकडे स्थानिक पर्यटनाला त्याचा फायदा होऊन देशासाठी उत्पन्न मिळवा. हा आमचा हेतू आहे.

आग्वादवर लाईट आणि साउंड शो

आग्वाद किल्ल्यावर लाईट आणि साउंड शो सुरु करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असून लवकरच त्याची अमलबजावणी केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याकडे असून पर्यटनासाठी केवळ १५ हजार पर्यटकांची मर्यादा आहे, ती वाढवून २० हजारांपर्यंत करावी, अशी मागणी करीत हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्याची इच्छा सावंत यांनी व्यक्त केली.

आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम

या महोत्सवात स्थानिक कलाकार आणि इतर राज्यातील कलाकारांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम झाला. पुढील तीन दिवस अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यात गोव्याचे खास वैशिष्ट्य असणाऱ्या कार्निव्हलने विशेष दाद मिळवली. याशिवाय पाककृती स्टॉल्स, संगीत मैफिलीचेही आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव यापुढे दरवर्षी आयोजित केला जाणार असल्याचे केला जाणार आहे. ज्यामुळे स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT