Crime Dainik Gomantak
गोवा

इंग्रजीच्या तासाला अचानक स्क्रीनवर झळकली नको ती फिल्म; अन्...

आपल्या जगप्रसिद्ध कळंगुटात (Calangute) नावाजत्या हायस्कूल तथा बोर्डीग स्कूलमध्ये (Boarding School) घडलेली सत्य घटना आहे.

दैनिक गोमन्तक

रोजच्या प्रमाणे आज (बुधवारी ) क्लासरुममध्ये (Classroom) नियमित वर्ग चालुं होते मात्र, नेहमीप्रमाणेच  अभ्यासात गुंतलेल्या विद्यार्थ्यांसमोर अचानक समोरच्या स्क्रीनवर पोर्न फिल्म (Porn movie) सुरू झाली आणी सर्वाच्याच हुदयाचा ठोका चुकला, ही कुठल्या इंग्रजी  चित्रपटातील घटना नसून  आपल्या जगप्रसिद्ध कळंगुटात (Calangute) नावाजत्या हायस्कूल तथा बोर्डीग स्कूलमध्ये (Boarding School)  घडलेली सत्य घटना आहे.

बहुतेक भारतीय  विद्र्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या येथील नावाजत्या हायस्कूल कम बोर्डीग  हायस्कूलात उपस्थित मोजक्याच विद्यार्थ्यासमोर नियमित वर्ग चालूं असतांना अचानक चालंत  स्क्रीन वर अश्लील क्लीप सुरु झाल्याने अंदाजे दोन ते तीन मिनिटे उपस्थित  विद्यार्थ्यां समोर  घडलेल्या या घटनेने सर्वाचीच भंबेरी उडाली.

दरम्यान, घडलेल्या घटनेची  खबर सध्या वार्यासारखी संम्पुर्ण पंचक्रोशीत पसरली असून यासंबंधात त्या हायस्कूल कम बोर्डीग कडून सरतेशेवटी स्थानिक पोलिसांत यासंबंधात अज्ञाता विरोधात  तक्रार सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, कळंगुट पोलिस (Calangute Police) स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्याकडून या घटनेची वाच्यता करण्यात आलेली नसून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे माहिती हाती लागली आहे. दरम्यान, हायस्कूल व्यवस्थापनातील तंत्रज्ञ विभागातील कुणातरी व्यक्ती कडून अश्लाघ्य प्रकार जाणुन बुजून घडवून आणल्याची चर्चा सध्या याभागात सुरु आहे. पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून जारी आहे......

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT