Pravin Arlekar In Gudhi Padwa 2023 Festival Dainik Gomantak
गोवा

Pravin Arlekar : एकोप्याने राहण्याचा संकल्प दिवस गुढीपाडवा : आर्लेकर

पेडणे नववर्ष स्वागत समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक गोमन्तक डिजिटल

गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचे नववर्ष. हा सण सर्वांनी एकत्र येऊन उत्साहात व एकोप्याने राहण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले. पेडणे नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित सार्वजनिक गुढीपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी नगरसेवक शिवराम तुकोजी, विष्णू साळगावकर, माजी नगरसेवक गजानन सावळ देसाई, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी गोपाळ शेट्ये आणि ग्रामस्‍थ उपस्‍थित होते.

अंकुश परब यांनी डॉ. जयंत आठले यांचा नववर्षाचा संदेश वाचून दाखविला. नंतर प्रभातफेरीला सुरवात झाली. ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’, ‘जय शिवाजी जय भवानी’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘श्री राम जय राम जय जय राम’च्या गजरात संपूर्ण बाजारपेठेला वळसा घालून टॅक्सी स्टँड येथे प्रभात फेरीची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT