Goa Heritage Festival 2023  Dainik Gomantak
गोवा

Goa Heritage Festival 2023 : वैविध्यपूर्ण वारशाचा सन्मान सोहळा

रसिक मंत्रमुग्ध; आज शेवटचा दिवस

दैनिक गोमन्तक डिजिटल

साळगाव येथे सुरू असलेल्या गोवा हेरिटेज फेस्टिव्‍हलच्या दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. पूर्णानंद च्‍यारी यांची सांगीतिक मैफल, नामांकित गायिका लोर्ना यांचे गायन आणि इम्पेरियल बँडने सादर केलेल्या संगीत कार्यक्रमाने हा महोत्सव उंचीवर नेला.

पर्यटन खात्यातर्फे आयोजित या महोत्सवातून राज्यातील श्रीमंत संस्कृती आणि वारशाबाबत वैविध्यपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये अस्सल गोमंतकीय पाककला संस्कृतीतील विविध खाद्य व पेयपदार्थांची ३६ दालने म्हणजे संस्मरणीय अशी खाद्यभ्रमंती.

त्याचबरोबर काजू फेणी निर्मितीचे प्रात्यक्षिकही प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. तर गोमंतकीय पारंपरिक लोकनृत्यांचे कार्यक्रम एकूणच महोत्सवास आनंदमय संगीत, नृत्य, पाककला, हस्तकला, कारागिरी असे विविध पारंपरिक कलाप्रकार या महोत्सवामधून आपली पंरपरा, वैशिष्ट्ये सादर करत आहेत. गोवा पर्यटन विभागाद्वारे साळगाव येथे आयोजित हा उपक्रम ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे.

आजही विविध कार्यक्रमांची रेलचेल

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये ‘मोग आनी मोयपास’ हा कोकणी तर ‘श्यामची आई’ हा मराठी चित्रपट दाखविला जाईल.

५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी खास गोमंतकीय पोषाखाविषयक फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच नाट्यगीत, भावगीत, मराठी-कोकणी कांतारा, निमशास्त्रीय गीते अशी सुरेख व चौरस संगीत मेजवानीही मिळत आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT