Goa Beach   Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: गोव्यातील किनाऱ्यांवरही आता राहणार AI ची नजर

उच्च दर्जाच्या कॅमेरा देखरेखीसाठी केंद्र सरकारशी चर्चा

Akshay Nirmale

Rohan Khaunte: गोव्याची राजधानी पणजीत वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर केला जात आहे. त्यानंतर आता किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच किनाऱ्यावरील गैरप्रकार रोखण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) वापर केला जाणार आहे, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी याबाबत माहिती दिली.

त्यासाठी उच्च दर्जाचे कॅमेरे लागणार आहेत. या कॅमेऱ्यांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारशी बोलणी झाली आहेत.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सव्दारे त्याठिकाणी येणाऱ्या व्यक्तीची माहितीही घेतली जाईल व किनाऱ्यावर बेकायदेशीर प्रकार बंद होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे. पीपीपी तत्त्वावर किनाऱ्यांची माहिती देणारे फलक उभारून जाहिरातीला परवानगी देत कॅमेरा बसवण्यास सध्या सांगण्यात आले आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमात पर्यटन वाढीबाबत बोलताना मंत्री खंवटे यांनी सांगितले की, किनारा व्यवस्थापन पॉलिसी तयार केली आहे. केवळ किनाऱ्यावरील स्वच्छता नाही, तर किनाऱ्याकडे जाणाऱ्या वाटेवरील 100 मीटरपर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यास सांगावे, अशी सूचना केली होती, ती मान्य केली आहे.

स्वदेश दर्शन योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून दक्षिण गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर साधनसुविधा उपलब्ध करून दिली जात आहेत. कोलवा येथे 21 ते 23 एप्रिल दरम्यान, पर्यटन फेस्टिवलचे आयोजन केले आहे. याचा फायदा पर्यटनवाढीसाठी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT