Goa Traffic: गोव्यातील अपघातांच्या पार्श्वभुमीवर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांच्या पालनाबाबत आरटीओकडून मोहिम राबवली जात आहे. या पार्श्वभुमीवर शुक्रवारी एकाच दिवसात वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांकडून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.
शुक्रवारी एका दिवसात वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमभंगाचे 1924 गुन्हे दाखल केले. त्यातून 10.85 लाख रूपये दंड वसुल केला गेला आहे.
वाहतूक पोलिस अधीक्षक बास्युएट सिल्वा आणि पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी ही माहिती दिली. संपुर्ण राज्यभरात ही मोहिम राबवण्यात आली आहे.
सुसाट गाडी चालवणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवणे, चुकीच्या ठिकाणी पार्किंग, वाहनाची कागदपत्रे सोबत न बाळगणे, लेन सोडून वाहतूक करणे, वाहनाचा प्रदुषण परवाना नसणे, वाहनाची नंबरप्लेट नसणे, नोएंट्री मधून वाहन चालवणे इत्यादी अशा कारणांवरून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.