Valpoi Dainik Gomantak
गोवा

पट्टेरी वाघाच्या अस्तित्वावर पुन्हा शिक्कामोर्तब

सत्तरी तालुक्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Valpoi: सत्तरी तालुक्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. हल्लीच झालेल्या पट्टेरी वाघांच्या हल्ल्यात गोळावलीत पाळीव जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर म्हादई वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली केल्याने नुकसानग्रस्त लोकांना आर्थिक भरपाई अवघ्या आठ दिवसांत मिळाली. त्यामुळे वन खात्यावर लोकांचा विश्वास संपादन होण्यास अधिक बळकटी मिळणार आहे.

२०२० साली झालेल्या घटनेत चार पट्टेरी वाघांवर विष प्रयोगासारखे प्रकार घडले होते. त्यानंतर आता वनविभागाने दक्षता बाळगून नुकसान भरपाईची कार्यवाही तातडीने केल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. गोळावलीतील मालो पावणे आणि भिकाजी बैलूडकर यांच्या अनुक्रमे रेडकू आणि पाडे वाघांच्या हल्ल्यात मरण पावले होते. त्यामुळे दोघांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्याची गंभीर दखल घेत म्हादई वनविभागाने घेऊन दोघांना आर्थिक भरपाईसाठी वेळीच पावले उचलली. पर्यावरण तज्ञ (Environmental Experts) राजेंद्र केरकर यांनी याबद्दल म्हादई वनविभागाचे कौतुक केले आहे.

व्याघ्र क्षेत्राची घोषणा व्हावी

गेल्या सात वर्षांत जंगलात बसवलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघांची छबी बंदिस्त झाली आहे. २०१९ साली साट्रे गावातील म्हादईच्या हिरव्यागार वनराईत कॅमेरात मादी वाघ व सोबत दोन बछडी टिपली होती. सत्तरी तालुका म्हादई अभयारण्य (Sanctuary) हे व्याघ्र क्षेत्र म्हणून नावारूपाला आले आहे. पण तशी घोषणा अजून झालेली नाही. २०१५ साली पट्टेरी वाघाचे दर्शन कॅमेरातून झाले होते.

या प्राण्यांचा अभयारण्यात अधिवास

काही वर्षांपूर्वी वाघांच्या पायांचे ठसे, तसेच मलमूल आढळले होते. त्याचे नमुने डेहराडूनला पाठविण्यात आले होते. तसेच अन्य वन्यप्राणीही (Wild Animals) येथे दृष्टीक्षेपात आले आहेत. यात वनमानव, अस्वल, पाक मांजर, खवले मांजर, चौशिंगा, मेरू, पिसय यांचा समावेश आहे. १९९९ साली अधिसूचित केलेले म्हादई अभयारण्य (Sanctuary) हे वाघांचा पूर्वापार नैसर्गिक अधिवास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT