In the accident Mapusa fire station staff got stuck in the car Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: अपघातग्रस्त गाडीत अडकलेल्या चालकाची अर्ध्या तासाने सुटका

शिरसईत अपघात : जीव लागला टांगणीला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident: शिरसई येथे स्वयंअपघातानंतर चारचाकीत अडकून पडलेल्या जखमी चालकास अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिसांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर गाडीतून बाहेर काढले. या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून तो म्हापसा फायर स्टेशनचा कर्मचारी आहे. या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.

प्राप्त माहितीनुसार, प्रकाश घाडी (42) असे या जखमी वाहनचालकाचे नाव आहे. गुरुवारी (ता.9) दुपारी 12 वा.च्या सुमारास हा अपघात घडला. घाडी जीए 04 सी 4658 या ओम्नी गाडीतून जात असताना, अचानकपणे त्यांचा डोळा लागल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जाते. ते ऑन ड्युटीवर नव्हते.

शिरसई पंचायतजवळील रस्त्याशेजारील एका झाडाला प्रकाश यांच्या गाडीची जोरदार धडक बसली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघाताची तीव्रता जास्त असल्याने ते काही वेळ गाडीतच अडकून पडले.

या घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन तसेच कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने त्यांना गाडीतून बाहेर काढले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT