Goa Accident News  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : मापा-पंचवाडी येथे कारची झाडाला धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

15 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु

Rajat Sawant

राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. रस्ता अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गत साडेचार महिन्यांत राज्यातील अपघातांचे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा घटले असले तरी मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे.

मापा-पंचवाडी येथे चालकाचा ताबा सुटल्याने कारचा अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यु झाला असून 5 जखमींना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कारमधून एक कुटुंब रिवण येथे घरी जात होते. यावेळी मापा-पंचवाडी येथे आले असता चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली.

या धडकेत 15 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु झाला तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या 18 वर्षीय युवतीचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला. इतर 5 जखमींना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

असाच एक भीषण अपघात सकाळी सांकवाळ कुठ्ठाळी येथे दोन कारमध्ये झाला. यात तीनजण जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ड्रायव्हरची झोप लागल्याने हा अपघात झाला अशी माहिती मिळत आहे.

दिलासादायक बाब म्हणजे एका कारमध्ये एक वर्षाचे बाळ होत मात्र, सुदैवाने या अपघातात बाळाला कोणतीही जखम झाली नसून, ते सुखरूप आहे. अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT