Tilari Dam Repair Work Dainik Gomantak
गोवा

Tilari Water Problem: पाण्‍याच्‍या तीव्र दाबाने तिळारी कालव्‍याचा दरवाजा उघडेना!

दैनिक गोमन्तक

Tilari Water Problem: तिळारी धरणाच्या कालव्यात उघडणारा दरवाजा पाण्याच्या प्रचंड दाबामुळे अडकून पडला आहे. तो उघडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तो दरवाजा उघडेपर्यंत पर्वरी आणि साळगावची तहान भागणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

पाणी सोडल्यानंतरही ते पर्वरीत पोचण्यासाठी तिनेक दिवस लागणार असल्याने पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू होण्यास नवे वर्ष उजाडू शकते.

तिळारी धरणातून अस्नोड्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पाला होणारा पाणीपुरवठा अद्याप सुरू झाला नसल्याने बार्देश तालुकावासीयांचे सध्या पिण्याच्या पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत.

विशेष म्हणजे, पर्वरी व साळगावमधील स्थानिकांना मागील महिनाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तिळारीतून पुरवठा तांत्रिक कारणास्तव सुरू करणे शक्य झाले नाही.

पाण्याअभावी नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी नियोजनानुसार पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी दिवसाआड, तर काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

ग्राहकांवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, म्हापसा शहरातील सुरु असलेल्या

भूमिगत वीजवाहिनीच्या कामांमुळे धुळेर परिसरात जलवाहिनी फोडल्याने या भागातील पाणीपुरवठावर मागील तीन दिवसांपासून परिणाम झाला आहे. पाणीपुरवठा लवकर पूर्ववत करावा अशी मागणी नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी शासनाकडे केली आहे.

तिळारीहून गोव्याला कच्च्या पाण्याचा पुरवठा अद्याप पूर्ववत झाला नसल्याने पर्वरी तसेच साळगाव मतदारसंघात सध्या पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कालव्याच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी तिळारीचे कच्चे पाणी बंद केल्याने पर्वरी येथील 15 एमएलडी प्रकल्प बंद पडला आहे.

जोपर्यंत तिळारीतून पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत पर्वरीमधील जलशुद्धीकरण केंद्र पुढचे काही दिवस तरी पुन्हा सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे बार्देशवासीयांचे पाण्याविना मागील महिनाभरापासून सुरू असलेले हाल लवकर संपण्याची चिन्हे नाहीत.

पर्वरी, साळगावात मोठी समस्या

तिळारीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सोडलेले पाणी अस्नोड्यातील प्रकल्पात पोहचण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागतो, तर पर्वरी येथील प्रकल्पापर्यंत पाणीपुरवठा होण्यास किमान 6 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे पर्वरी तसेच साळगावातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास नव्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे संकेत सध्यातरी मिळत आहेत.

तूर्त टँकरद्वारे पाणीपुरवठा

पाण्याविना नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाकडून सध्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्वरी तसेच साळगाव मतदारसंघातील लोकांना मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणीपुरवठ्यात 45 टक्के घट

प्राप्त माहितीनुसार, सध्या पाणीपुरवठ्यात किमान 45 टक्के घट झाली आहे. बार्देश तालुक्याची तहान भागविण्यासाठी दररोज 120 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या त्यात घट होऊन सरासरी 70 एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले.

या भागांत सर्वाधिक झळ

सर्वात जास्त झळ ही टोकाला किंवा उंचावरील भागांना झाला आहे. पर्वरी तसेच साळगांव मतदारसंघाबरोबर कळंगुट, कांदोळी, शिवोली, हणजूण यासारख्या भागांना पोहोचला आहे. अशा भागांना दिवसा आडून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT