Goa Traffic Issue: उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी कोंडी टाळणार

Goa Traffic Issue: पर्वरीसाठी लवकरच वाहतूक व्यवस्थापन आराखडा
Porvorim Flyover
Porvorim FlyoverDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Issue: राज्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा धूमधडाका सुरू असून पर्वरी रस्त्यावर उड्डाणपुलाचे (कॉरिडोर) काम येत्या जानेवारी महिन्यापासून सुरू केले जाणार असल्याने त्या काळात तेथे वाहतुकीची कोंडी होणार आहे.

Porvorim Flyover
Sunburn Festival 2023: 28 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 'सनबर्न फेस्टिव्हल'बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

त्यावर पर्याय म्हणून पर्वरी परिसरात वाहनांसाठी वाहतूक व्यवस्थापन आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

हल्लीच झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनच्या उद्‍घाटनावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पर्वरीतील राष्ट्रीय महामार्गाचाच भाग असलेल्या उड्डाण पुलाची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्या कामाला जानेवारीपासून सुरवात होईल अशी घोषणा केली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापन आराखड्याबाबत पोलिस व सार्वजनिक बांधकाम खाते तसेच इतर संबंधित खाती कामाला लागली आहेत.

पर्वरीतील राष्ट्रीय महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर एखादा लहानसहान अपघात घडला, तर वाहतुकीची कोंडी होते व ही कोंडी सोडवताना वाहतूक तसेच स्थानिक पोलिसांच्या नाकीनऊ येते.

त्यामुळे पर्यायी रस्त्याचा आराखडा तयार करताना पोलिसांना या रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचाही विचार करावा लागणार आहे.

Porvorim Flyover
Goa News: बॉक्‍समध्‍ये सापडले दहा दिवसांचे अर्भक!

आधीच पर्वरी परिसरात वाहतुकीची कोंडी दरदिवशी सुरू असते त्यातच या उड्डाण पुलाच्या (कॉरिडोर) कामामुळे त्यामध्ये भर पडणार आहे.

5 किलोमीटरचा होणार उड्डाण पूल

पर्वरी परिसरात सुमारे 5 किलोमीटर लांबीचा हा उड्डाण पूल होणार आहे. या रस्त्यावर तीन ठिकाणी वाहतूक सिग्नल आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. उड्डाण पूल झाल्यावर वाहतूक सिग्नल लागणार नाही. वाहनचालकांना ओ कोकेरो येथून थेट पर्वरी बाजारापर्यंत व पुढे म्हापसा किंवा त्यापुढे कोणत्याही सिग्नलविना जाता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com