Goa Private Bus: Dainik Gomantak
गोवा

Goa Private Bus: खासगी बस तिकीट दरावर नियंत्रण आणा!

Goa Private Bus: उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या तिकीट दरावर नियंत्रण आणा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची शाखा ‘सुराज्य अभियान’ या संस्थेने गोव्याच्या वाहतूक खात्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Private Bus:

उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या तिकीट दरावर नियंत्रण आणा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची शाखा ‘सुराज्य अभियान’ या संस्थेने गोव्याच्या वाहतूक खात्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधीचे निवेदन वाहतूक खात्याचे उपसंचालक (उत्तर विभाग) बी.ए. सावंत यांना देण्यात आले.

हे निवेदन देताना ‘सुराज्य अभियान’च्या शिष्टमंडळामध्ये सुशांत दळवी, मिहीर दळवी आणि दिलीप शेट्ये यांचा समावेश होता.

निवेदनात म्हटले आहे की, शाळांना उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानंतर मागणी वाढल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसच्या तिकिटांचे दर नियमित दरापेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिक वाढविले जातात. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो.

महाराष्ट्र राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या तिकीट दरावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘जी.आर्.’ काढला आहे. त्यानुसार खासगी बसचालकांना राज्य शासनाच्या बसच्या तिकीट दरापेक्षा अधिकाधिक दीडपट दर आकारता येतो.

अशाच प्रकारे गोवा सरकारनेही खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या तिकीट दरावर नियंत्रण आणणारा आदेश तातडीने जारी करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

Ponda: रितेश नाईकांच्या गळ्यात माळ पडणार का? फोंड्याचा आमदार बिनविरोध निवडण्याची मागणी; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे मौन

Goa Politics: खरी कुजबुज; स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी

Panaji Spa Ban: पणजीत 'स्पा'ना बंदी! अखेर मनपाला आली जाग; नवीन परवानग्या दिल्या जाणार नाहीत

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

SCROLL FOR NEXT