E-Bus Service In Panjim Dainik Gomantak
गोवा

Goa E-Bus: ई-बसेसचा निर्णय अन्यायकारक

दैनिक गोमन्तक

Goa E-Bus:

स्मार्टसिटी योजनेअंतर्गत पणजी बसस्थानक ते बांबोळी, दोनापावला, ताळगाव, मिरामार तसेच बांबोळी व्हाया दोनापावला या मार्गावरील मिनीबसेस बंद करून त्याजागी कदंबच्या विद्युत (इलेक्ट्रिक) बसेस सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेताना खासगी बसमालकांना विश्‍वासात घेऊन चर्चा केली नसल्याने हा निर्णय अन्यायकारक आहे.

अंत्योदय तत्त्वावर चालणारे सरकार हुकूमशाही पद्धतीने वागून बस व्यावसायिकांना रस्त्यावर आणले आहे. मुख्यमंत्री आश्‍वासने देऊन ती पाळत नसल्याचा आरोप बसमालकांनी करून न्यायालयात जावे लागेल, असे मत व्यक्त केले.

पणजी बसस्थानक ते बांबोळी, दोनापावला, ताळगाव, मिरामार तसेच बांबोळी व्हाया दोनापावल या मार्गावर सुमारे 70 खासगी बसगाड्या दरदिवशी प्रवाशांना सेवा देतात. बसमालकांनी रस्ता कर तसेच विमा भरलेला आहे. हल्लीच काही बसमालकांनी फिटनेस प्रमाणपत्रही घेतले आहे. त्यामुळे सरकारला या बसेस बंद करून कदंबच्या बसेस सुरू करायच्या होत्या, तर वाहतूक खात्याने खासगी बसमालकांकडून रस्ता कर तसेच विमा भरण्याची सक्ती का केली असा प्रश्‍न उपस्थित बसमालकांनी केला.

गेल्यावर्षी 28 डिसेंबर 2023 रोजी स्मार्ट सिटी अंतर्गत कदंब बसगाड्या सुरू करण्यासंदर्भातचा मसुदा अधिसूचना जारी केली. त्यावर तीन दिवसांत हरकती व सूचना मागितल्या असता त्या वाहतूक सचिवांकडे सादर करण्यात आल्या. मात्र, चर्चा करण्यासाठी किंवा यासंदर्भात स्पष्ट चित्र उघड करण्यासाठी बसमालकांना विश्‍वासात घेण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेण्यात आली, तेव्हा चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते, असे सुदप ताम्हणकर म्हणाले.

‘बसमालाकांची दिशाभूल’

हल्लीच 14 मार्चला स्मार्ट सिटीसंदर्भात बैठक झाली असता मुख्यमंत्र्यांनी पणजी परिसरातील मार्गांवर खासगी बसगाड्यांऐवजी कदंबच्या बस सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगून बसमालाकांची दिशाभूल केली आहे, असे अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT