Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गणेशपुरी हल्ल्यातील जखमीचा मृत्यू; संशयित सहाजणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Goa Crime News: युवकाचा मंगळवारी (ता.१८) उपचारादरम्यान गोमेकॉत मृत्यू झाला. तब्बल १८ दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: गणेशपुरी-म्हापसा येथे लोखंडी सळीच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या अहमद देवडी (३०, म्हापसा) या युवकाचा मंगळवारी (ता.१८) उपचारादरम्यान गोमेकॉत मृत्यू झाला. तब्बल १८ दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी संशयितांविरोधात भादंसंच्या ३०२ कलमाखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील फरार संशयित आरके तसेच इतरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही अहमदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा देवडीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. ही प्राणघातक हल्ल्याची घटना गणेशपुरी येथील ओव्हरहेड टाकीजवळ (ता.३० मे) पहाटे ३ वा.च्या दरम्यान घडली होती. आतापर्यंत म्हापसा (Mapusa) पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.

काहीजण फरार, काहीजण कोठडीत

वैयक्तिक रागातून हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणातील रामकृष्ण भालेकर ऊर्फ आरके तसेच इतर संशयित अद्याप फरार आहेत. तर पोलिसांनी आतापर्यंत मंथन च्यारी, श्रीधर किल्लेदार, अभिषेक पुजारी (म्हापसा) यांना ३० मे रोजी अटक केली होती. हे संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, शरणबासू गायकवाड, नागराज पुजारी व बोरेश पुजारी यांना ६ जून रोजी अटक केली. हे संशयित सध्या पोलिस कोठडीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US War Ceasefire: 40 दिवसांचा रक्तरंजित संघर्ष थांबला! इराण-अमेरिका यांच्यात युद्धविराम; पण 'त्या' 10 अटींवरुन जगात खळबळ

Goa Assembly Election: 2027 मध्ये रितेश नाईकच हवेत, मगोचा आग्रह; फोंडा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत दीपक ढवळीकरांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

Pooja Naik: ‘सॉरी’वरच प्रकरण मिटवलं! कोलवाळ तुरुंग प्रशासनाचा घोळ; पूजा नाईक बेकायदा बाहेर

Ishan Badgujar Death Case: 'ड्रग्ज कॉकटेल'ने घेतला जीव, आता 'ते' 8 मित्र गोवा पोलिसांच्या रडारावर; ईशान बडगुजर मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

घातक रसायनांचा शोध आता लागणार क्षणार्धात! चेन्नईतील संशोधकांनी विकसित केली अत्यंत वेगवान आणि अचूक तंत्रज्ञान प्रणाली

SCROLL FOR NEXT