panaji goa Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City : पणजी ‘राम भरोसे’; ‘स्मार्ट सिटी’ कामांची डेडलाईन आज संपणार

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City :

पणजीचे आमदार बाबूश मोन्‍सेरात यांनी आज ‘स्‍मार्ट सिटी’च्‍या कामांची पाहणी केली. यावेळी त्‍यांनी पणजी तुंबण्‍याची शक्‍यता नाकारली नाही. त्‍यामुळे पणजीवासीयांच्‍या ताटात आणखी काय-काय वाढून ठेवले आहे, हे त्‍या देवालाच माहीत.

राजधानी पणजीत स्मार्ट सिटी’ अंतर्गत सुरू असलेली कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्‍यात येतील, असे प्रतिज्ञापत्र सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात सादर करण्‍यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्‍त कामे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. पण हा दावा किती खरा आणि किती खोटा हे येणारा पावसाळा दाखवून देणार आहे.

बाबूश मोन्सेरात यांनी आज गुरुवारी सकाळी स्‍मार्ट सिटीच्‍या कामांची पाहणी केली. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिगीस, महानगरपालिका आयुक्त ग्लेन मेदेरा, अभियंता विवेक पार्सेकर, अधिकारी व कंत्राटदार उपस्‍थित होते. मळा येथून सुरू झालेली ही पाहणी सांतिनेजमधील काकुलो जंक्शन येथे संपली.

पणजीवासीयांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात आणि त्यांचे राहणीमान उंचवावे, यासाठी स्मार्ट सिटीची कामे सुरू केलेली

आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत धुळीमुळे लोकांचे जे काय हाल झाले, ते त्‍यांनाच

माहीत.

यामुळे काही नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्‍यानंतर न्यायालयाच्या शिष्टमंडळाने सांतिनेजमधील कामांची

पाहणी केली होती. त्यावेळी सरकारच्या वतीने न्यायालयात ३१ मेपर्यंत कामे पूर्ण होतील, असे प्रतिज्ञापत्र दिले होते.

पणजीवासीयांनो, आला पावसाळा, स्‍वत:ला सांभाळा!

दिलेल्‍या मुदतीनुसार ३१ मेपर्यंत कामे पूर्ण होतील का? हा सवाल होता आणि त्याचे उत्तर बाबूश मोन्‍सेरात यांनी आज देऊनही टाकले. पावसाळ्यात पणजीत पाणी तुंबणार काय? हा प्रश्‍‍न सर्वांना सतावत आहे. तसी शक्यताही बाबूशनी नाकारली नसल्याने पणजीकरांनी तुंबणाऱ्या पाण्याचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे, असेच एक प्रकारे त्‍यांनी सूचित केले आहे.

पाहणीवेळी महापौरांची अनुपस्थिती; स्‍वारी विदेशात

महापौर तथा ‘आयपीएससीडीएल’ मंडळावर सदस्य म्हणून असलेले रोहित मोन्सेरात यांची आजच्‍या पाहणीवेळी अनुपस्‍थिती प्रकर्षाने जाणवली. सध्‍या ते विदेश दौऱ्यावर असल्‍याचे समजते. अवकाळी पावसामुळे पणजीत पाणी साचल्यानंतरही आमदार बाबूश मोन्सेरात रस्त्यावर उतरले नसल्याने त्‍यांच्‍यावर समाजमाध्यमांतून टीकेची झोड उठविण्‍यात आली होती.

स्मार्ट सिटीची कामे ९० टक्के पूर्ण झालेली आहेत. कुंडईकरनगर येथून जाणारी स्टॉर्म ड्रेन वाहिनी घालण्याचे काम बाकी आहे. पणजीतील मुख्य वाहिन्यांपैकी ती एक असून, या कामाची निविदा काढली नसल्याने ते काम राहिले आहे. त्‍यामुळे यंदा पावसाळ्यात कदाचित १८ जून मार्गावर पाणी साचू शकते. पणजीतील अन्य भागांत पाणी साचेल की नाही हे मी सांगू शकत नाही.

- बाबूश मोन्‍सेरात, आमदार (पणजी)

पणजीतील ‘स्मार्ट सिटी’ची अनेक कामे प्रलंबित आहेत.

९० टक्के कामे झाल्याच्या बाता हा केवळ पणजीकरांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत यांनी

स्वत: लक्ष देऊन ही कामे पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

- उत्पल पर्रीकर

१ पावसात राजधानी

पाण्‍याखाली जाण्‍याची भीती

२ कामे ९० टक्के पूर्ण झाल्याचा बाबूशचा दावा

३ पदपथ, पथदीप, मॅनहोलची कामे अजून सुरूच

४ महत्त्‍वपूर्ण रस्‍त्‍यांचे काम पावसाळ्यानंतरच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT