The daughter killed her father Incident at Velim Dainik Gomantak
गोवा

मुलीने केली बापाची हत्या, आंबेली-वेळ्ळी येथील घटना

मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

आंबेली-वेळ्ळी येथे मुलीने बापाची हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी आणि संबंधीत पालकांनी दिली आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांसह कुंकळ्ळी पोलिस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तीने रागाच्या भरात हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. मुलीचे मेडीकल चेकअप करून पोलिस (police) पुढील कारवाई करणार आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मारियानी मनोरुग्ण होती. तिच्यावर उपचार सुरू होते. बऱ्याच दिवसांपासून तिने औषध घेतले नव्हते. औषधे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या वृध्द आईला तिने शनिवारी मारहाण केली होती. त्यानंतर तिची आई पावलीना जवळच असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली होती. यादरम्यान तीने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अनेक दिवसांपासून भरती असलेल्या 49 वर्षीय रुग्णाने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पहिला मजला आणि उंची कमी असल्याने हा रुग्ण (Patient) किरकोळ जखमी झाला. तो आजाराला कंटाळला असल्याची माहिती मिळाली. या रुग्णाने शनिवारी सकाळी वाॅर्डबॉयची नजर चुकवून रुग्णालयाची (Hospital) गॅलरी गाठली आणि तिथून सरळ खाली उडी मारली. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकारांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT