Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa News: सासूने मांजरीला मारले म्हणून सुनेने केली पोलिसात तक्रार

Goa News: एरवी माणसा-माणसांत भांडण, मारामारी झाली की हमखास पोलिसांत तक्रार केली जाते; पण एखाद्या मांजरीला मारल्याची तक्रार अभावानेच होते.

दैनिक गोमन्तक

Goa News: एरवी माणसा-माणसांत भांडण, मारामारी झाली की हमखास पोलिसांत तक्रार केली जाते; पण एखाद्या मांजरीला मारल्याची तक्रार अभावानेच होते. प्रत्यक्षात फोंडा येथे मांजरीला मारल्याची तक्रार सुनेने सासूविरुद्ध केली आहे.

सिल्वानगर येथील एका घरात पर्शियन जातीच्या मांजरीला जखमी केल्याची तक्रार आल्फिया रेगो या सुनेने सासू रोजी रेगो यांच्याविरुद्ध फोंडा पोलिसांत मंगळवारी केली. ५ रोजी दुपारी १२ वाजता रोजी यांनी मांजरीच्या डोक्यावर अवजड वस्तू फेकून मारल्याने ती जबर जखमी झाली.

मांजरीच्या डोक्यासह चेहऱ्यावरही जखमा झाल्या असून रोजी यांची सून आल्फिया हिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. फोंडा पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली असून संशयित रोजी रेगो यांच्याविरुद्ध मांजरीला अमानुषपणे मारल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT