Calangute BJP Dainik Gomantak
गोवा

Calangute BJP: कळंगुटच्या विकासाचे श्रेय केवळ भाजपचेच : शिरोडकर

गेल्या दहा वर्षांत विकासाचा पाया जो भाजपने या कळंगुटात घातलेला आहे तो आपणा सर्वांना पुढे न्यायचा आहे असे शिरोडकर यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Calangute BJP: कळंगुटचा विकास हा केवळ भाजपमुळेच झालेला आहे. त्या विकास कामांचे श्रेय  कुणा व्यक्तीकडे जात नसून पक्ष संघटनेच्या सांघिक कार्याचे यश असल्याचे कळंगुट मतदारसंघ (Calangute Constituency) भाजपाचे संभाव्य उमेदवार गुरूदास शिरोडकर यांनी सांगितले. येथील श्री शांतादुर्गा संस्थानात मंदिरात देवी चरणी सामुहिक प्रार्थना केल्यानंतर आपल्या प्रचाराची सुरुवात करताना स्थानिक पत्रकारांशी शिरोडकर बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत महिला मोर्चाच्या गीता परब, कळंगुट भाजपा गट मंडळाचे यशवंत कांदोळकर, अल्पसंख्याक गटाचे विरेन परैरा, युवा मोर्चाचे सिद्धीक गोवेकर तसेच मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या एकूण 34 उमेदवारांच्या यादीत कळंगुट मतदार संघातून आपले नाव जरी नसले तरी भाजपच्या (BJP) वरिष्ठांनी आपल्याला अनौपचारिकरित्या प्रचाराची सुरुवात करण्याचे आदेश दिल्यानेच आपण आपल्या समर्थकांसमवेत शुक्रवार पासून प्रचाराची खर्याअर्थाने सुरुवात करत असल्याचे शिरोडकर यांनी यावेळी सांगितले.

गेल्या दहा वर्षांत विकासाचा पाया जो भाजपने या कळंगुटात घातलेला आहे तो आपणा सर्वांना पुढे न्यायचा आहे असे शिरोडकर यांनी यावेळी सांगितले. श्री. शांतादुर्गा संस्थान नंतर गुरुदास शिरोडकर यांनी आपल्या समर्थकांसमवेत खोब्रावाडा कळंगुट येथील जाग्रुत श्री. बाबरेश्वर देवाचेही दर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT