Babu Kavlekar Dainik Gomantak
गोवा

न्यायालयाने आम्हाला न्याय दिला; बाबू कवळेकर

या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा कोणताही विचार नाही; बाबू कवळेकर

दैनिक गोमन्तक

गोवा : आमदार अपात्रता याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर त्या बारा आमदारांना व पात्रता पासून दिलासा मिळाला आहे. यामुळे राज्यातील अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून गोव्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजपकडून यानिर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. तर यावर आपली पहिली प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांनी, न्यायालयाने आम्हाला न्याय दिला असे म्हटले आहे. तर आम्ही जनतेच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठीच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. 10 मार्चलाही जनता आमच्याच बाजूने निकाल देईल असेही ते म्हणाले.

तसेच न्यायालयाच्या या निकाला नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी, बदनामी करण्याच्या मोहिमेवर लोकशाही आणि लोकतंत्र जनादेशाचा विजय झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आमदार अपात्रता याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर या निर्णयाला काँग्रेस सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. गोवा काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना कोर्टाने आमदार अपात्रता याचिका फेटाळली असली तरीही लोकांच्या कोर्टात आम्हाला न्याय मिळेल.

पक्षांतर करणाऱ्या त्या आमदारांना गोव्यातील जनताच नाकारेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर मगोपच्या सुदिन ढवळीकरांनी यांनी, कोर्टाच्या या निर्णयावर स्पष्टपणे भाष्य करणे टाळले आहे. तसंच वरच्या कोर्टात (court) या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र याचा अंतिम निर्णय पक्षाची केंद्रीय समितीच्या बैठकीत घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail Drug Racket: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT