Bits Pilani Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Student : पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा जल्लोष

दीक्षांत सोहळा : ‘बिट्स पिलानी’ च्या समारंभात पश्‍चिम बंगालच्या राज्यपालांची उपस्थिती

Shreya Dewalkar

शिक्षण क्षेत्रात लौकिकप्राप्‍त बिट्स पिलानी (झुआरीनगर)चा दीक्षांत समारंभ रविवारी उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 1,254 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉक्टरेट मिळवणारे 26 जण, 132 एमई आणि 1,096 विद्यार्थी हे बीई आणि एमएससी पदवीधारक आहेत.

बिट्स पिलानी कॅम्पसमधील भव्य सभागृहात हा समारंभ पार पडला. या सोहळ्यासाठी भारतीय सांख्यिकी संस्थेच्या (कोलकाता) प्रा. संघमित्रा बंडोपाध्याय प्रमुख पाहुण्या, तर पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंदा बोस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच बिट्स पिलानीचे कुलगुरू प्रा. व्ही. रामगोपाल राव, प्रा. सुमन कुंडू, कर्नल एस चक्रवर्ती (निवृत्त) व इतर मान्यवर हजर होते.

प्रा. राव यांनी ‘बिट्स पिलानी’च्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या कामगिरीची आढावा घेतला.

पदक विजेत्‍यांचा सन्‍मान

पदवी पदक विजेत्यांमध्ये आर. रामनाथन (सुवर्ण), वरुण सिंग आणि सुश्री अस्मिता लिमये (रौप्य) आणि चिराग गोयल (कांस्य) या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. बंडोपाध्याय म्हणाल्या की, शिक्षण हे जग बदलू शकणारे सर्वांत शक्तिशाली शस्त्र आहे. भारताने बरेच काही साध्य केले असले तरी आणखी पुढे जाणे बाकी आहे. या प्रवासात ‘बिट्स पिलानी’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

सर्वांगीण विकास हेच ध्येय!

पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांनी बिट्स पिलानीचे अभिनंदन केले. ते म्हणाले, की नवकल्पना आणि अंमलबजावणी ही परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे. बिट्स पिलानीने तरुणांच्या मनात स्वतःसाठी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. बिट्स पिलानीचे कार्य कौतुकास्पद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT