Mapusa Shot Circuit: दैव बलवत्तर म्हणून टळली दुर्घटना; शॉट सर्किटमुळे वीजवाहिन्या जळल्या

म्हापसा मार्केटमधील घटना : दैव बलवत्तर म्हणून टळली दुर्घटना!
Mapusa Shot Circuit
Mapusa Shot CircuitDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Shot Circuit: नगरपालिका येथील मार्केटमध्ये रविवारी सायंकाळी धाकुली हॉटेल लेनच्या दुकानांसमोरील छपरावर वीजवाहिन्या शॉट सर्किटमुळे जळाल्या. एका वेटरने या छपरावरुन धूर येत असल्याचे पाहिल्यानंतर अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Mapusa Shot Circuit
Water Pipeline: फुटलेल्या जलवाहिनीचे काम अर्धवट; नागरिकांतुन संताप व्यक्त...

जवानांनी शिडीच्या सहाय्याने छपरावर जावून या स्थितीवर नियंत्रण मिळविले. हा प्रकार रात्रीच्या वेळी घडला असता तर मोठी आपत्ती ओढवली असती. दैव बलवत्तर म्हणून हा मोठा अनर्थ टळला, असे नागरिक बोलत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, रविवारी (ता.२०) सायंकाळी 3.45 च्या सुमारास छपरावरुन धूर येत असल्याचे साई सदानंद हॉटेलमधील एका वेटरने पाहिले. नंतर तत्काळ म्हापसा अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण केले.

परंतु दलाचा बंब घटनास्थळापर्यंत (पाँईटवर) पोहचू शकला नाही. कारण, फळविक्रेत्यांचे बस्तान रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात असल्याने बंबास जाण्यास पुरेशी वाट नव्हती. सोबतच, वाहनास वळण (टर्न) घेण्यास अडथळा निर्माण झाला. यावेळी फळविक्रेत्यांचे साहित्य हटवून गाडीला जागा करण्याचा प्रयत्न केला, तरीही बंब आपल्या पाँईटवर पोहचला नाही. नंतर जवानांनी शिडीच्या सहाय्याने छपरावर जाऊन स्थितीचा अंदाज घेत यावर नियंत्रण मिळविले.

स्थिती जैसे थे

यापूर्वी, येथे एका महिलेला आत्पकालिन सेवेची गरज भासली होती. त्यावेळी रुग्णवाहिकेस आतमध्ये प्रवेश करता आला नव्हते. परिणामी, स्ट्रेचरवरुन या महिलेस मार्केटबाहेर आणावे लागलेले. त्यानंतर, म्हापसा पालिकेने व्यापारी संघटना, अग्निशमन दलाने संयुक्त पाहणी केली. याशिवाय पालिकेने पुरेशी जागा आपत्कालिन सेवेला उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना होती. परंतु, आजच्या घटनेनंतर स्थिती जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले.

Mapusa Shot Circuit
Goa Monsoon Update: राज्यात पावसाची पुन्‍हा दमदार हजेरी

पाच मीटर जागा अनिवार्य

मार्केटच्या अंतर्गत रस्त्यावर कुठल्याही आडकाठीशिवाय आपत्कालिन गाडीला येता यावे यासाठी मध्यंतरी संयुक्त पाहणी केली. गाडीला जाण्यासाठी किमान पाच मीटर जागा असणे अनिवार्य आहे. मात्र मार्केटमधील स्थिती सुधारलेली नाही. दिवसाच्या घटनेमुळे मोठी आपत्ती टळली, असे म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com