Goa School
Goa School Dainik Gomantak
गोवा

तेरसेनार-हळदोणा सरकारी शाळेची स्थिती दयनीय

दैनिक गोमन्तक

म्हापसा: तेरसेनार-हळदोणा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या कथित दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणेने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. उद्या शुक्रवारपासून (ता.१ जुलै) राज्यातील सर्व बालवाडी वर्ग सुरु होताहेत. आणि मोडकळीस आलेल्या या शाळेची दयनीय स्थिती पाहता मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशावेळी या बालवाडीत मुलांना कसे पाठवायचे, अशी भीती पालकांना भेडसावत आहे. ( The condition of Haldona Government School is deplorable; Student safety question on the agenda )

सध्या पावसाळा असल्याने पाऊस पडला की वर्गात पाणी शिरते. शाळेचे छत गळू लागले आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या इमारतीची अवस्था ही सध्या दिवसेंदिवस अधिकच वाईट होत आहे.

अशावेळी या मुलांच्या सुरक्षतेची दखल घेत, निद्रींस्त प्रशासनाने जागे होऊन सदर इमारतीचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावी, अशी माफक अपेक्षा या पालकवर्गांकडून होत आहे. सध्या या शाळेतील बालवाडीतील सेविका तसेच मदतनीस स्वतःचा जिव मुठीत धरुन इथे काम करीताहेत. भर म्हणजे, याठिकाणी कडधान्य ठेवलेल्या खोलीला गळती लागली आहे.

या बालवाडीच्या दुरुस्ती कामावर मागील अनेक वर्षे सरकारचे दुर्लक्ष झालेले दिसते. या शाळेची कौले फुटली असून छप्पराचे लाकडी साहित्य मोडकळीस आले आहे. त्यामुळे शाळेची विद्यमान अवस्था पाहता कुठल्याही क्षणी एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे स्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

गेल्या वर्षी स्थानिकांनी या शाळेची स्वखर्चाने डागडुजी केली होती. भर पावसात छप्परावर वाढलेले गवत त्यांनी हटविले होते. शिवाय नवीन कौले घालत, वासे सुद्धा बदलेले. त्याचप्रमाणे रंगरंगोटी केली होती. तेव्हा तात्पुरता सोय करुन ग्रामस्थांनी ही डागडुजी केली होती. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी या शाळेचा वापर एक मतदान केंद्र म्हणून करण्यात आलेला. त्यावेळी तिथे निर्माण झालेला कचरा हा आजही साफ होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

वर्गासह व्हरांड्यात पावसाचे पाणी

गळती छप्परामुळे वर्गासह व्हरांड्यात सर्वत्र पावसाचे पाणी साचू लागले आहे. त्यातून चालणे कठीण होऊ लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, शाळेच्या आवारात वाढलेली झाडे काही प्रमाणात या बालवाडीच्या शिक्षिकेने स्वखर्चाने साफ करुन घेतली. मात्र, काही ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडून टाकल्याने या शाळेच्या आवारात इतरही गैरवापर चालतात, असेच म्हणावे लागेल. शिवाय शौचालयांची स्थिती वाईट आहे.

गेल्या वर्षी ग्रामस्थांनी निधी जमवून या शाळेची तात्पुरता डागडुजी केली होती. मात्र, पुन्हा एकदा निधी कसा जमवायचा आणि दुरुस्ती कशी करायची, हा स्थानिक युवकांसमोर प्रश्न आहे. स्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारने हे दुरुस्ती काम हाती घ्यावे आणि शाळेचा हरवलेला पूर्वीचा गतवैभव पुन्हा प्राप्त करुन विद्यार्थ्यांसह स्थानिकांना दिलासा द्यावा.- समीर गडेकर, ग्रामस्थ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT