वास्को : चिखली उपजिल्हा इस्पितळातील ऑपरेशन थिएटर पुढच्या गुरुवारी (दि.7) जुलैपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. सुरुवातीला मंगळवार व गुरुवार असे दोन दिवस ऑपरेशन थिएटर रुग्णासाठी खुले राहणार आहे अशी, माहिती नीज गोयकार फौज या बिगर सरकारी संस्थेचे संस्थापक सुरेश नाईक यांनी दिली.
चिखलीतील उपजिल्हा इस्पितळाचे लोकार्पण होऊन सहा वर्षांहून अधिककाळ लोटला. मात्र या इस्पितळात डॉक्टर्स तसेच इतर साधन सुविधांअभावी इस्पितळ अजून बॅकफुटवर आहे. यात मुख्य म्हणजे ऑपरेशन थिएटर.
ऑपरेशन थिएटर नसल्याने रुग्णांना लहान ऑपरेशनला सुद्धा बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात धाव घ्यावी लागते. दरम्यान याची दखल घेऊन येथील निज गाेंयकार या बिगर सरकारी संस्थेने येथील मुख्य डॉक्टर्स व संबंधित अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून या इस्पितळात ऑपरेशन थिएटर मध्ये साधन सुविधा उपलब्ध करण्यास भाग पाडले.
त्यानुसार गेल्या दिडवर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या नीज गोंयकार फौज या बिगर सरकारी संस्थेला यश आले आहे. आता इस्पितळातील ऑपरेशन थिएटर लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे. एक दोन गोष्टी सोडल्यास ऑपरेशन थिएटर साधन सुविधांनी सज्ज झाले आहे.
दरम्यान नीज गोंयकर फौजने आज चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात भेट देऊन ऑपरेशन थिएटरची पाहणी केली. नंतर त्यांनी येथील आरोग्य अधिकारी अनिल उम्रस्कर यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये साधनसुविधा कमतरतेविषयी जाणून घेतले.
याविषयी नीज गोयकार फौज या बिगर सरकारी संस्थेचे संस्थापक सुरेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्याने चिखली येथील ऑपरेशन थिएटर तयार होण्यासाठी आम्ही बिगर सरकारी संस्था गेली दीड वर्षाहून अधिक काळ आरोग्य संचालक आणि मुख्य आरोग्य अधिकारी चिखली यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत.
ऑपरेशन थिएटर तयार आहे. फक्त काही छोट्या आवश्यक वस्तूंची गरज आहे. तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये औषधांची आणि डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ही कमतरता या आठवड्यात भरून काढली जाईल व पुढच्या गुरुवारी दि.7 जुलैपासून उपजिल्हा इस्पितळातील ऑपरेशन थिएटर कार्यान्वित होणार असे आरोग्य अधिकारी डॉक्टर उम्रस्कर यांनी सांगितले असल्याचे नाईक म्हणाले.
पहिल्या टप्प्यात मंगळवार आणि गुरुवार असे दोन दिवस सदर ऑपरेशन थिएटर रुग्णासाठी चालू असणार असे ते म्हणाले. दरम्यान एनजीओ सुरेश नाईक व त्यांच्या फौजने संपूर्ण इस्पितळात फेरफटका मारला असता अनेक त्रुटी त्यांच्या नजरेस आल्या.त्या त्यांनी आरोग्य अधिकार्यांच्या नजरेस आणून दिल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.