Goa Sports News Dainik Gomantak
गोवा

Goa Sports News: मासोर्डेत फुटसाल मैदानाची संकल्पना साकार

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नामुळे अवघ्या 10 महिन्यांत मासोर्डेत सुसज्ज असे फुटसाल मैदान साकारले गेले.

दैनिक गोमन्तक

Goa Sports News: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नामुळे अवघ्या 10 महिन्यांत मासोर्डेत सुसज्ज असे फुटसाल मैदान साकारले गेले. येत्या शनिवार (ता.९) संध्याकाळी 6.30 वाजता या मैदानाचे उदघाटन राणेंच्या हस्ते होणार आहे.

मासोर्डे येथे तरुणांना खेळण्यासाठी सुसज्ज मैदानाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे राणे यांनी याकडे खास लक्ष दिले.

सत्तरीत अनेक खेळाडू आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या फुटसाल मैदानामुळे त्यांना आणखी संधी मिळेल. सर्वांनी सहकार्य करुन पुढे जाण्याची गरज आहे. आज हे मैदान पूर्ण होताना अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राणे यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात, मासोर्डे प्रभाग ४चे नगरसेवक प्रसन्ना गावस म्हणाले, की या मैदानासाठी देवस्थान समिती व मैलू गावस यांनी दिलेली परवानगी तसेच देवस्थानचे माजी अध्यक्ष पुंडलिक गावस यांचे वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे काम लवकर पूर्ण झाले.

गोकुळदास गावस म्हणाले, या मैदानामुळे ग्रामस्थांचे एक स्वप्न साकार झाले. त्यामुळे आम्ही आरोग्यमंत्र्यांचे आभारी आहोत. तर, खेळाडू आशीष गावस म्हणाले, या मैदानामुळे आम्हा क्रीडापटूंना चांगली संधी मिळणार आहे.

उत्‍साही, आनंदाचे वातावरण

फुटसाल मैदान उपलब्ध झाल्यामुळे गावातील क्रीडाप्रेमी तसेच खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता वेगवेगळ्या भागातील क्रीडापटू आमच्या गावात येऊन या मैदानावर खेळतील. विविध स्पर्धा होतील. त्यातून चांगले खेळाडू घडतील. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व गावच्या नगरसेवका प्रसन्ना गावस यांच्यामुळे ग्रामस्थांचे मोठ स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रीया क्रीडापटूंनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT