Mapusa in Narendra Modi  Dainik Gomantak
गोवा

पर्रीकरांच्या सभेतूनच 'काँग्रेसमुक्त भारत' संकल्पनेला सुरुवात; नरेंद्र मोदी

मला नेहमी माझे मित्र मनोहर पर्रीकरांची उणीव भासते; नरेंद्र मोदी

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात म्हापसा येथे दाखल झाले. याठिकाणी त्यांनी एक भव्य सभेला संबोधित केले. यापूर्वी गोवा भारतीय जनता पक्षाने (भाजप) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. आज पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज म्हापसा (Mapusa) येथे सायंकाळी 5 वाजता दाखल होणार होते मात्र त्यांना याठिकाणी पोहचायला दोन तास उशिर झाला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी म्हापशात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. म्हापशातील प्रसिद्ध देवस्थान बोडगेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या जाहीर सभेला सुरुवात केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 14 फेब्रुवारीला गोव्यात पुन्हा एकदा एकेक मतदार कमळ फुलवण्यासाठी मतदान करणार आहे. त्यासाठी मी भाजपच्या सर्व उमेदवारांना भव्य विजयाच्या शुभेच्छा देतो आहे. मला नेहमी माझे मित्र मनोहर पर्रीकरांची उणीव भासते, तुम्हाला गोवेकरांनाही ती उणीव जाणवत असेल अस म्हणत त्यांनी पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा दिला.

पुढे बोलताना म्हणाले की, पर्रीकरांनी येथेच माझी एक सभा आयोजित केली होती. त्यावेळी एक शब्द निघाला होता काँग्रेसमुक्त भारत, माझ्या तोंडून निघालेला हा शब्द देशभरातील कोट्यवधी लोकांचा संकल्प बनला आहे. तसेच गोवा सर्वांना सोबत घेऊन चालतोय. ज्यांना गोव्याच्या संस्कृतीची परवा नाही त्यांनी आपल्या भ्रष्टाचाराचा आणि लूटतंत्राचा एटीएम गोव्याला बनवलं होतं अस म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT