Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: आजपासून आचारसंहिता लागू होणार; लोकसभेसाठी कडेकोट सुरक्षा

Lok Sabha Election: ‘वर्चस्व फ्लॅग मार्च’ला सुरवात

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील विविध भागात निमलष्करी दलाच्या पोलिसांमार्फत ‘वर्चस्व फ्लॅग मार्च’ सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी हा फ्लॅग मार्च हडफडे, शिवोली तसेच कोळवाळ, पिर्ण व अस्नोडा या भागातून कढण्यात आला.

निवडणूक आचारसंहिता काळात कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‍भवू नये यासाठी या दलाच्या पोलिसांचे अशा प्रकारचे फ्लॅग मार्च अधूनमधून सुरूच राहतील, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

निवडणुकीचे बिगुल शनिवार, 16 रोजी दुपारनंतर वाजणार असून त्यानंतर राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त या निवडणुकीच्या काळात निमलष्करी

दलाच्या अतिरिक्त तुकड्या सुरक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागवण्यात येणार आहेत. सध्या दोन तुकड्या गोव्यात दाखल झाल्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये सुमारे 100 पोलिस असून प्रत्येकी दोन्ही जिल्ह्यांसाठी एक तुकडी देण्यात आली आहे.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने या निमलष्करी दलाची पथके विविध परिसरात गेल्या काही दिवसांपासून दिवसा व रात्री फेऱ्या मारू लागली आहेत. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणत्याही दंगलीचे प्रकार होऊ नयेत व एकप्रकारे निवडणूक काळात अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे वर्चस्व फ्लॅग मार्च करण्यात येतो, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT