Jit Arolkar Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यानी अगोदर आपल्या मतदार संघात लक्ष द्यावे; जित आरोलकर

आपण जर क्रिमिनल आहे तर न्यायालय शिक्षा करणार मात्र जनतेची दिशाभूल करून अपप्रचार करू नये; जित आरोलकर

दैनिक गोमन्तक

मोरजी : मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे मांद्रे मतदार संघात येऊन अर्ध्या माहितीच्या आधारे आमच्यावर टीका करण्यापेक्षा अगोदर आपल्या मतदार संघावर लक्ष द्यावे आणि तिथं निवडून यावे, आणि आपण जर क्रिमिनल आहे तर न्यायालय शिक्षा करणार मात्र जनतेची दिशाभूल करून अपप्रचार करू नये असे आवाहन मांद्रे मगोचे उमेदवार जित आरोलकर (Jit Arolkar) यांनी पत्रकार परिषदेत केले.

मुख्यमंत्री (CM) डॉक्टर प्रमोद सावंत 10 रोजी मांद्रे येथे भाजपच्या (BJP) कोपरा बैठकीला रात्री 9 वाजता आले होते त्यावेळी अल्प प्रतिसाद मिळालेल्या सभेत बोलताना आपल्यावर आपण क्रिमिनल असून बेल वर बाहेर असल्याचे सांगत सुटले आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

10 हजार नोकऱ्यांचं काय झालं

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना आपला आणि पक्षाचा पराभव दिसत असल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. शिवाय मांद्रेत मगोचा विजय दिसत असल्याने ते मांद्रेत येऊन आपल्यावर टीका करतात त्यांनी टीका करण्याऐवजी निवडणुका (Election) पूर्वी जे 10 हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्यांचे काय झाले?असा सवाल करून, गोमंतकीय बेरोजगार यंदाच्या निवडणुकीत मताद्वारे उत्तर देतील असा दावा जित आरोलकर यांनी केला.

मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी अगोदर आपल्यावर ज्या केसेस आहे त्याची पूर्ण माहिती मिळवावी व नंतरच आपल्यावर टीका करावी असे आवाहन केले.आपल्यावर ज्या केसेस आहे त्याची मुख्यमंत्री सावंत यांनी चौकशी करावी,असे आवाहन जित आरोलकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shiroda: संतापजनक! दरवाजा फोडून केली चोरी, नंतर दुकानच दिले पेटवून; 12 लाखांचे नुकसान

Water Flow Meter: 'मतांसाठी मोफत पाणी देणार नाही'! गोव्यात वॉटर फ्लो मीटर’चा होणार वापर; पाणी चोरी, गळतीवर येणार नियंत्रण

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतींची निवडणूक 13 डिसेंबरला? राज्य सरकार करणार घोषणा; प्रभाग फेररचना होणार पूर्ण

Goa Rain: पावसाबाबत नवी अपडेट! पुढच्या आठवड्यात कोसळणार सरी; वाचा ताजा अंदाज

Goa Politics: 'युतीतील पक्षांचे खच्चीकरण हेच काँग्रेसचे ध्‍येय'! आतिषी यांचा स्‍वबळावर लढण्याचा नारा; निवडणुकीत नवे चेहरे उतरवणार

SCROLL FOR NEXT