आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. याच पाश्वभूमीवर शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आज गोवा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे खाजदार संजय राऊत उपस्थित आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा जाहीरनामा प्रदर्शित करण्यात आला आहे.
गोव्यातून शिवसेना सर्व स्थरांवरुण निवडणुका लढवणार, आणि गोव्याच्या घराघरात शिवसैनिक पोहोचला आहे. त्या सोबतच आम्हांला जनतेचा चांगलाच प्रतिसाद दिसून आला आहे. गेल्या पाच वर्षात एनडीएच्या प्रत्येक मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला आहे. गोव्यात विज आणि पाण्याचे प्रश्न तसेच आहेत. निवडणुका आल्या की कामाचे वेगवेगळ्या मुद्द्याचं राजकारण सुरु होते असा टोला ही यावेळी ठाकरेंनी लगावला आहे.
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे :-
1) प्रथम 'ती'
- आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार.
2) युवा सक्षमीकरण आणि खेळाडूंकरिता
- तालुका स्तरावर युवा पिढीच्या फिटनेसच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती ठिकाणी व्यायामशाळा / ओपन जिम उपलब्ध करणार.
- नवी मुंबईच्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सच्या धर्तीवर फुटबॉल आणि इतर खेळांकरिता आंतरराष्ट्रीय स्तराची अकादमी उभी करणार.
3) दर्जेदार शिक्षणासाठी सुविधा
- राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्याकरिता व्यवस्था निर्माण करणार.
4) ग्राम विकास
- एनडीआरएफच्या धर्तीवर आपतकालीन सेवेकरीता त्वरीत सुरक्षा रक्षक मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचा प्रशिक्षित गट तयार करणार.
5) उद्योग व रोजगार
- स्थानिकांना 80 टक्के आरक्षित नोकऱ्यांसाठीच्या कायद्याची सक्त अंमलबजावणी करून त्यामध्ये असंघटित व कंत्राटी कामगारांचा समावेश करणार आणि भूमिपुत्रांना न्याय देणार.
6) शहर विकास
- राज्यातील शहरांमध्ये अंतर्गत बससेवा व इलेक्ट्रीक बसेस सुरु करणार.
7) सन्मान निराधारांचा
- निराधार योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार.
8) अन्न हे पूर्णब्रम्ह
- राज्यात 200 ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.