CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेत पंचायतींना केल्या आहेत 'या' सूचना

मुख्यमंत्री डॉ. सावंत ः मान्सूनपूर्व कामांचा आढावा; साखळीतील पंचांना आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant मतदारसंघातील सर्व पंचायतींमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन सरपंच, उपसरपंच, पंच सदस्यांशी संवाद साधला. सर्व पंचायतींकडून मान्सूनपूर्व कामांचा आढावा त्यांनी घेत विविध सूचना केल्या.

पावसाळ्यात सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व पंचायतींना सांगितले.

साखळी मतदारसंघातील कुडणे, न्हावेली, आमोणा, सुर्ल, पाळी कोठंबी, वेळगे व हरवळे या सातही पंचायतींना सकाळच्या सत्रात मुख्यमंत्र्यांनी धावती भेट दिली. या भेटीत गावातील विविध समस्या, मान्सूनपूर्व कामांची तयारी, वीज, पाणी समस्या इत्यादी विविध विषयांवर पंचायत मंडळ सदस्यांशी चर्चा केली.

तसेच गावातील भेटायला आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. सर्व पंचायतींना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, पाळीचे सरपंच शिवदास मुळगावकर, वेळगेचे सरपंच सामंता कामत, सुर्लाच्या सरपंच विश्रांती सुर्लकर, कुडणेचे सरपंच राजेंद्र फाळकर, न्हावेलीचे सरपंच कालिदास गावस, आमोण्याचे सरपंच कृष्णा गावस, हरवळेचे सरपंच राजू मळीक यांच्यासह पंचायत सदस्य उपस्थित होते.

साखळीतील सातही पंचायतींना भेटी

साखळी मतदारसंघातील सर्व सातही पंचायतींमध्ये भेटी देऊन पावसासाठी तयार राहण्याचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले. सरकारी पातळीवर जर कोणत्याही प्रकारचे काम असल्यास तत्काळ आपणास कळवावे.

ते लवकरात लवकर करून दिले जाईल. सामान्य लोकांना पावसात समस्या होऊ नये यासाठी लक्ष द्या असे सर्व पंचायतींना आपण सांगितले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पालकांना सुरक्षिततेचे आवाहन

सोमवारपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून पोलिस व वाहतूक पोलिस यांना सतर्क राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पालकांनीही मुलांची ने - आण करताना सुरक्षा बाळगावी व पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT