Mumbai Goa Vande Bharat Train : ‘वंदे भारत’ ट्रेन मुंबई-गोवा मार्गावर उद्यापासून धावणार

मुंबई स्थानकावरून सकाळी 5.25 वाजता ही गाडी सुटेल
Mumbai Goa Vande Bharat Train
Mumbai Goa Vande Bharat TrainDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Vande Bharat Train ओडिशात बालासोर येथे शुक्रवारी रात्री कोरोमंडल एक्सप्रेसला भीषण अपघात झाल्यामुळे आज, शनिवारी मडगाव रेल्वे स्थानकावर होणारा ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ कार्यक्रम जरी रद्द केला असला, तरी ही एक्सप्रेस आता 5 जूनपासून मुंबई-मडगाव मार्गावर नियमितपणे सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

Mumbai Goa Vande Bharat Train
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या ताज्या किमती

5 जून रोजी सीएसटी मुंबई स्थानकावरून सकाळी 5.25 वाजता ही गाडी सुटेल. रेल्वे दुर्घटनेमुळे ही गाडी शुक्रवारी रात्रीच मुंबईला रवाना झाली, अशी माहिती बबन घाटगे यांनी दिली.

Mumbai Goa Vande Bharat Train
All India Chess Federation: खासदार तेंडुलकर यांना न्यायालयाचा झटका
  • मुंबईहून सकाळी ५.२५ वाजता सुटेल.

  • मडगाव स्थानकावर दुपारी १.१५ वा. पोहोचेल.

  • मडगावहून दुपारी २.३५ वाजता सुटेल.

  • मुंबईत ‘सीएसटी’वर रात्री १०.२५ वाजता पोहोचेल.

(शुक्रवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सेवा)

प्रमुख थांबे : दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com