Goa Assembly Session | CM Pramod Sawant | Ureka Dias Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: नेदरलँडच्या युवतीला वाचवणाऱ्या गोमंतकीय युवकाला मुख्यमंत्र्यांनी घोषित केला पुरस्कार

15 ऑगस्ट रोजी करणार गौरव; परप्रांतीय आरोपी तरूणाच्या हल्ल्यात गोव्याचा तरूण जखमी

Akshay Nirmale

Goa Assembly Session 2023: मोरजी येथील रिसॉर्टमध्ये नेदरलँडच्या युवतीवर त्यात रिसॉर्टमधील परप्रांतीय तरूणाने बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी गोव्यातील एका स्थानिक युवकाने या युवतीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या परप्रांतीय तरूणाशी दोन हात केले. त्या गोमंतकीय युवकाची दखल गोवा सरकारने घेतली आहे.

युरेका डायस असे या गोमंतकीय युवकाचे नाव आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याला बक्षीस जाहीर केले आहे. युरेका डायस याचा येत्या 15 ऑगस्ट रोजी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत विधानसभेत निवेदन करताना म्हणाले की, पेडणेतील या प्रकारातील संशयित आरोपीला अटक केली आहे. युरेका जॉन डायस याने संबंधित युवतीला वाचवले. त्याचे कौतूक आहे. महिलेला वाचवल्याबद्दल त्याचे मी अभिनंदन करतो. आणि त्याला सरकारतर्फे बक्षीस दिले जाईल.

तो सध्या रूग्णालयात आहे आणि त्याला आता कोणताही धोका नाही. सर्व हॉटेलना परप्रांतीय कामगारांची माहिती ठेवावी, कामगारांकडे गोवा लेबर कार्ड असले पाहिजे. कामगारांची नोंदणी असली पाहिजे. पोलिस त्याची चौकशी करत आहे. पर्यटन राज्य म्हणून ही काळजी सर्वांनी घ्यायची आहे.

दरम्यान, युरेका डायस हा बीच रिसॉर्टमध्ये फूड अँड बेव्हरेजेस मॅनेजर म्हणून काम करतो. घटना घडली तेव्हा तो पत्नीसोबत घरात जेवत होता. युवतीचा आवाज त्याच्या कानावर पडताच त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्याच्यामुळे हल्लेखोर पसार झाला.

मोरजी येथील एका रिसॉर्टमध्ये नेदरलँडहून आलेल्या युवतीवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. त्या युवतीचा आरडाओरडा ऐकून युरेका डायस या युवकाने तिच्या टेंटमध्ये धाव घेतली. त्यावेळी युवतीवर हल्ला करणारा परप्रांतीय अभिषेक वर्मा याने पळ काढला होता.

त्यानंतर वर्मा हा पुन्हा चाकू घेऊन आला आणि त्याने युरेका डायसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या युरेकासह युवतीला उपचारासाठी बांबोळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

29 मार्च रोजी दुपारी मोरजी येथील वेल विंग ह्या बीच रिसोर्टमध्ये युवतीने भाड्याने घेतलेल्या टेंटमध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. संशयित आरोपी अभिषेक वर्मा (वय 27) हा मूळचा देहरादून, उत्तराखंड येथील आहे.

या प्रकरणाचा तपास पेडणेचे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत आणि एसडीपीओ राजेश कुमार यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT