Goas famous wild fruit  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : आकर्षण रानमेव्याचे...जांभूळ, चुरने बाजारात

दैनिक गोमन्तक डिजिटल

सध्या रानमेव्याचे दिवस असून, जांभळांसह चुरने (तोरणे) डिचोलीच्या बाजारात विक्रीस उपलब्ध झाली आहेत. तरीदेखील बाजारात जांभूळ आणि चुरनांचे प्रमाण कमी असल्याने या रानमेव्याचा भाव वाढला आहे.

जांभूळ 3 रुपये प्रतिनग या दराने विकले जात आहे. मात्र, करवंदे अजून बाजारात आलेली नाहीत. त्यामुळे खवय्यांना करवंदांची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

ग्रामीण भागात रानमेवा सहज उपलब्ध होत असल्याने सध्या चुरने आणि जांभूळ या रानमेव्यासाठी गावागावांतील मुले, युवक-युवती रानावनात भटकंती करीत असल्याचे चित्र काही भागांत दिसून येत आहे.

उष्णतेचा पारा चढला आणि उकाडा असह्य झाला, की प्रत्येकाला रानावनात पिकणारी रसाळ फळे, अर्थातच रानमेव्याची आठवण होते. उन्हाळ्यात साधारण मार्च महिन्याच्या शेवटी रानमेवा बहरतो. आरोग्यवर्धक आणि गुणकारी असलेल्या रानमेव्याची चव चाखण्याचा मोह प्रत्येकाला होतो.

यंदा अजून तरी करवंदांसह काही रानमेवा काहीसा दुर्मीळ झाला आहे. गेल्या वर्षभरात अधूनमधून पडलेल्या अवकाळी पावसामुळे यंदा रानमेव्याच्या बहरावर काहीसा परिणाम झाल्याचा अंदाज आहे. त्यातच यंदा बहुतेक माळराने आगीत खाक झाल्याने चुरने, करवंदांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या मुळगाव येथे प्रवीण गाड हा दिव्यांग युवक रस्त्याच्या बाजूला जांभळे विकत आहे.

आरोग्यदायी जांभळे

आरोग्यासाठी गुणकारी असलेली जांभळे मिळवण्यासाठी काही भागात युवक बरेच खटाटोप करताना दिसतात. जांभळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जांभळे खाल्ल्याने रक्तशुद्धी होते. मधुमेही रुग्णांसाठी तर जांभळे अमृतासमान असल्याचे सांगितले जाते. जांभळापासून काही भागात दारूही गाळण्यात येते. सध्या बाजारात चुरने आणि जांभळे विक्रीस उपलब्ध होऊ लागली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT